• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याची जामिनावर सुटका

by Ganesh Dhanawade
February 15, 2023
in Guhagar
168 2
0
Cheater of women released on bail
331
SHARES
945
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर शहरातील प्रकार; ॲड. अलंकार विखारे यांनी केला युक्तिवाद

गुहागर, ता. 15 : सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा घरबसल्या रोजगार मिळवून देतो, असे सांगत जिल्ह्यातील 151 महिलांकडून सभासद फी व कच्चा माल देण्यासाठी गुहागर शहरातील 72 हजार 601 रुपयांचे रक्कम घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव येथील संदीप शरद मुळे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी गुहागर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. संकेत साळवी व ॲड. अलंकार विखारे यांनी काम पाहिले. Cheater of women released on bail

गुहागर पोलीस ठाण्यात महिलांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जून 2022 रोजी गरज फाउंडेशन या नावाने संदीप शरद मुळे याने व्हाट्सअप ग्रुप तयार केला व जिल्ह्यातील महिलांच्या संपर्कात राहून सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर घरबसल्या बनवून महिलांना रोजगार संधी मिळवून देतो असे सांगितले. आणि महिलांचे तालुका पातळीवर कमिटी नेमण्यास सांगितले व या कमिटीच्या माध्यमातून तेथील महिलांचे सभासद फी व इतर रोख रक्कम स्वतःच्या जळगाव येथील बँक खात्यात टाकण्यास सांगितले. सुरुवातीचे काही महिने लवकरच कच्चामाल पाठवून देतो असे सांगत चालढकल केली. Cheater of women released on bail

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

काही महिलांनी याबाबत ग्रुपवर विचारणा केली असता संदीप मुळे याने धमकी दिली. तसेच महिलांशी अर्वाच भाषेत संभाषण केले होते. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुहागर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. संदीप मुळे याचेवर भारतीय दंड विधान कलम 419, 420, 406 प्रमाणे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता. सदर आरोपीला आज मंगळवारी गुहागर न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीचे वतीने ॲड. अलंकार अजित विखारे यांनी युक्तिवाद केला. तसेच सदर आरोपीला न्यायालयाने रुपये 15 हजाराचे जामीनावर मुक्त करण्याचा आदेश केला आहे. आरोपीतर्फे ॲड. संकेत अरुण साळवी, ॲड. अलंकार अजित विखारे व ॲड. सुप्रिया सुरेश वाघधरे हे काम पाहत आहेत. Cheater of women released on bail

Tags: Cheater of women released on bailGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet83
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.