गुहागर, ता. 15 : गुहागर नगर पंचायतीच्या शिक्षण समितीतर्फे शिक्षण समिती सभापती सौ. मनाली सांगळे यांच्या माध्यमातून दोन अंगणवाड्याना खुर्च्या उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये जांगळेवाडी अंगणवाडीला चार खुर्च्या भेट देण्यात आल्या. Distribution of chairs to Janglewadi Anganwadi

या खुर्च्यांचे वितरण प्रभाग १५ च्या नगरसेविका तथा आरोग्य व स्वच्छता समिती सभापती सौ. स्नेहल सुनील रेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंगणवाडी मदतनीस श्रीमती दक्षता मोरे, विद्या गुरव, भारती चव्हाण, दर्शना मालप व अंगणवाडीतील मुले उपस्थित होती. Distribution of chairs to Janglewadi Anganwadi

