महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांचा परिचय
गुहागर, ता. 13 : भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता रमेश बैस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे. रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून १२ फेब्रुवारी २०२३ रोजी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. New Governor of Maharashtra Ramesh Bais

रमेश खोमलाल बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर, मध्य प्रदेश (आता छत्तीसगड मध्ये) झाला. त्यांचं शालेय शिक्षण भोपाळ मध्ये झालं. १ मे १९६८ रोजी त्यांनी रामबाई यांच्याशी विवाह केला. १९७८ मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. १९८० पासून १९८४ पर्यंत ते मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९८९ मध्ये तेव्हाच्या एकत्रित मध्य प्रदेश (आता छत्तीसगढ) च्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ते राज्यमंत्री होते. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत. लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. New Governor of Maharashtra Ramesh Bais

यावेळी राष्ट्रपती भवनाने देशातील १३ राज्यपालांची बदली केली आहे. रमेश बैस यांची झारखंडच्या राज्यपालपदावर नियुक्ती 2021 मध्ये झाली होती. दोनच वर्षांत त्यांना झारखंडमधून महाराष्ट्रात पाठवण्यात आलं आहे. भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिपदाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. New Governor of Maharashtra Ramesh Bais

