दि.12 फेब्रुवारी, 2023 रोजी रा.भा.शिर्के प्रशालेचे मैदान
रत्नागिरी, दि.11 : जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देणे तसेच जे उमेदवार स्वयंरोजगार करू इच्छितात त्यांना स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध विभागांकडील योजनांची एकाच छताखाली माहिती उपलब्ध करुन देणे व त्यांचे प्रस्ताव सादर करून घेणे, या उददेशाने राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या उद्योग विभागाकडून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने दि.12 फेब्रुवारी, 2023 रोजी रत्नागिरी येथे रा.भा.शिर्के प्रशालेच्या मैदानामध्ये भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Job Fair in Ratnagiri

या रोजगार मेळाव्यामध्ये कोकण विभागातील विविध जिल्हयातील 150 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. यासाठी www.ratnagirijobfair2023.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. शासनामार्फत नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली असून जे युवक-युवती इयत्ता पाचवी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहे. वय वर्षे १८ पूर्ण आणि रत्नागिरी जिल्हयाचा निवासी आहे असा कोणताही उमेदवार या संकेतस्थळावर नोंदणी करु शकतो. ज्या उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी उदय सामंत, पालकमंत्री यांच्या जावकर प्लाझा, जयस्तंभ, रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयामध्ये छापील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. मेळाव्यास येताना हा अर्ज भरून सोबत घेऊन यावा. Job Fair in Ratnagiri
अद्यापपर्यंत 7 हजार 500 पेक्षा जास्त बेरोजगार उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर आपली नोंदणी केली असून अंदाजे दहा हजार उमेदवार या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शासनाचे इतर विभाग जसे जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, नगरविकास विभाग, अग्रणी बैंक, विविध महामंडळे यांचे स्टॉल्स स्वयंरोजगार मेळाव्यात उभारण्यात येणार असून याव्दारे स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना कर्ज व अनुदानाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जे उमेदवार शासनाच्या योजनेद्वारे प्रस्ताव सादर करण्यास पात्र ठरतील अशा उमेदवारांचे प्रस्ताव दाखल करुन घेण्यासाठी आवश्यक मदत संबंधित विभागाकडून केली जाईल. Job Fair in Ratnagiri
रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यासाठी येताना सर्व उमेदवारांनी आपली शैक्षणिक व इतर अर्हतेबाबतची कागदपत्रे, मूळ प्रत व एक झेरॉक्स संच सोबत आणावीत. जिल्ह्याचे निवासी असलेल्या, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या व किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या व रोजगाराच्या शोधात असलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी व मेळाव्यास उपस्थित राहावे. तसेच जे उमेदवार स्वयंरोजगार करु इच्छितात अशा उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून विविध शासकीय विभागांच्या स्टॉल्सना भेट देऊन माहिती घ्यावी व पात्रतेनुसार आपला प्रस्ताव संबंधित विभागाकडे दाखल करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती विद्या कुलकर्णी यांनी केले आहे. Job Fair in Ratnagiri

