गुहागर बाजारपेठेतील नरेश वॉच कंपनी दुकानाला आज 35 वर्ष पूर्ण
गुहागर, ता. 10 : शहरातील गुहागर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार यांनी नरेश वॉच कंपनी हे दुकान 35 वर्षांपूर्वी गुहागर बाजारपेठेत सुरू केले होते. आज या दुकानाला 35 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने 35 वर्षापूर्वी दुकान सुरू केल्यावर पहिल्या आलेल्या ग्राहकाचा त्यांनी सत्कार केला. The owner felicitated the first customer

गुहागर बाजारपेठेत 35 वर्षांपूर्वी नरेश वॉच कंपनी हे घड्याळ दुरुस्ती व विक्री दुकान सुरू केले होते. त्या दुकानाचा शुभारंभानिमित्त आलेले पहिले ग्राहक वेळणेश्वर, भाटी येथील विनिता वनराज अडुरकर हे पहिलं ग्राहक होतं. या ग्राहकाचा सत्कार नरेश पवार व त्यांची पत्नी नीलम पवार यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन केला. The owner felicitated the first customer

यावेळी नरेश पवार, त्यांची पत्नी नीलम पवार तसेच गुहागरतील नामवंत हॉटेल व्यवसायिक सचिन मुसळे, मनोज बावधनकर निसर्ग लॉज चे कर्मचारी, नरेश वॉच चे कर्मचारी उपस्थित होते. The owner felicitated the first customer

ग्राहक हा देवो भाव आहे याची प्रचिती या निमित्ताने गुहागरात आली. अर्थात 35 वर्षांपूर्वी सुरु केलेल्या व्यवसायात पहिला आलेल्या ग्राहकाची नोंद ठेवणे सगळ्यानाच जमत नाही. मोठे ग्राहकांची नोंदणी करून ते लक्षात ठेवणे असे फारच कमी दुकानदार करत असतील. यामुळे ग्राहक देवो भव याची प्रचिती आज आली. नरेश पवार यांनी या केलेल्या उपक्रमाचे अनेकांनी स्वागतच केले आहे. नरेश पवार यांनी या नरेश वॉच दुकाना सोबत व्यवसायात वृद्धी करत मोबाईल शॉपी, निसर्ग लॉज सुरू केले आहे. The owner felicitated the first customer

