• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त शिवसेना तर्फे विविध कार्यक्रम

by Ganesh Dhanawade
February 10, 2023
in Guhagar
154 2
0
Chief Minister's birthday program in Guhagar
302
SHARES
864
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना गुहागरच्या वतीने आरोग्यविषयक व विद्यार्थी करीयर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी गुहागर महाविद्यालयातील सुमारे दिडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. Chief Minister’s birthday program in Guhagar

राज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. त्याचप्रमाणे गुहागरमध्येदेखील विविध कार्यक्रम घेवुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी करीयर मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शक म्हणुन संस्थापक संस्था संचालक स्पर्धा परीक्षा प्रशिक्षक, आ. रा.स. एज्युकेशन अकॅडमी रत्नागिरी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षक, करीअर समुपदेशक, शैक्षणिक समुपदेशन ९ वर्षांचा शैक्षणिक / करीअर समुपदेशनाचा अनुभव असणारे रत्नागिरीतील अँड. राकेश तुकाराम सत्वे उपस्थित होते. Chief Minister’s birthday program in Guhagar

Chief Minister's birthday program in Guhagar

या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मधुकर गंगावणे यांनी तर प्रस्तावना श्री. सुधाकर कांबळे यांनी केली. बाळासाहेबाची शिवसेना तालुका अध्यक्ष दिपक कनगुटकर यांनी आपल्या पक्षामार्फत घेण्यात येणा-या कार्यक्रमाची माहीती देवुन शुभेच्छा दिल्या. याचबरोबर गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. Chief Minister’s birthday program in Guhagar

Chief Minister's birthday program in Guhagar

यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, तालुका समन्वयक नारायण गुरव, संतोष आग्रे, अँड. सुशिल अवेरे, राकेश पवार, रोहन भोसले, मनिष मोरे, राजु धामणस्कर, मुन्ना तावडे, अमरदिप परचुरे, अरुण भुवड, शेखर विचारे, दत्ता जांगळी, दिपक कानसरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. Chief Minister’s birthday program in Guhagar

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Chief Minister's birthday program in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share121SendTweet76
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.