नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी
गुहागर, ता. 09 : नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेने गुहागर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता नगर पंचायत प्रशासन नागरिकांना हरकती, सूचना मांडण्यासाठीचा कालावधी निश्चित करून विकास आराखडा प्रसिद्ध करेल. Development plan of Guhagar will be released

नगर रचनाकार विभाग रत्नागिरीच्या अधिकार्यांनी दोन महिन्यांपूर्वी गुहागर शहराचा विकास आराखडा नगर पंचायतीकडे सूपुर्त केला होता. त्यानंतर नगरपंचायतीने विकास आराखडा समजून घेण्यासाठी 16 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये लोकप्रतिनिधींच्याअसे लक्षात आले की, सद्यस्थितीतील जमीन वापर आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर लोकप्रतिनिधी व जनतेने सांगितलेल्या सुधारणा, बदल, त्रुटी मधील काही गोष्टी सुधारल्या गेल्या नव्हत्या. तसेच विकास आराखड्यात निवासी वापरासाठीचे क्षेत्र ही अत्यल्प होते. नगरपंचायतीने सद्यस्थितीतील जमीन वापर आराखड्यात (ELU) यापूर्वी सांगितलेले बदलांप्रमाणे विकास आराखड्यात दुरुस्त्या करून नगररचनाकार विभागाने पुन्हा विकास आराखडा द्यावा. अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी या सभेत केली. त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेने हा विकास आराखडा जनतेसमोर नेण्यास असमर्थता दर्शविली. Development plan of Guhagar will be released
नगरपंचायतीच्या या निर्णयानंतर नगराध्यक्षांवर टीका झाली. भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत शहराचा विकास आराखडा जनतेसमोर ठेवावा. अशी मागणी केली होती. Development plan of Guhagar will be released

नगराध्यक्षांचा अभ्यास
या निर्णयानंतर नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी विकास आराखड्यातील छोट्या छोट्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला. विकास आराखड्याच्या मंजुरी देण्याची शासनाची प्रक्रिया, कायदेशीर बाबी लक्षात घेतल्या. त्यावेळी नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींना असलेले अधिकार, कायद्याने दिलेला वेळ या गोष्टींचा विचार करता गुहागरच्या विकासासाठी या आराखड्यात आपण सकारात्मक बदल करु शकतो हे नगराध्यक्षांच्या लक्षात आले. गुहागर शहराच्या पश्चिमेला समुद्र किनारा, सीआरझेडची मर्यादा, शहरातून जाणारा सागरी महामार्ग व पुर्वेला डोंगर अशी भौगोलिक रचना आहे. शहराच्या वाढीसाठी हरित क्षेत्र कमी करून निवासी क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नगर रचनाकार विभागाने दिलेल्या आराखड्यात नमूद असलेल्या निवासी क्षेत्रात 60 ते 70 टक्के वाढ करणे आवश्यक आहे. या क्षेत्राच्या वाढीचा विचार करून सध्या आराखड्यात टाकलेल्या आरक्षणांमध्ये फेरबदल करावा. शहरांतर्गत काही रस्त्याच्या दुतर्फा वस्ती असल्याने त्या रस्त्यांचे रुंदीकरण नागरिकांना अडचणी निर्माण करेल. असे अनेक मुद्दे नगराध्यक्षांनी समोर आणले. Development plan of Guhagar will be released
लोकप्रतिनिधीं केला प्रभागांचा अभ्यास
नगरसेवक, नगरसेविका यांनी देखील आपल्या प्रभागांचा अभ्यास केला. शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा लक्षात घेऊन काही बदलांची आवश्यकता नगरपंचायत प्रशासनासमोर मांडली. Development plan of Guhagar will be released

नगराध्यक्षांची मुत्सद्देगिरी
नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेवकांनी केलेल्या सर्व सूचना, फेरबदल आदींची एक टिप्पणी तयार करण्यात आली. या टिप्पणी प्रमाणे बदल करून विकास आराखडा द्यावा अशी विनंती नगरपंचायतीने नगररचनाकार विभागाला केली. मात्र केवळ पत्र देऊन हा विषय शासनस्तरावर पुढे सरकणार नाही. हे नगराध्यक्ष बेंडल यांना माहिती होते. म्हणून त्यांनी रत्नागिरी नगररचनाकार यांच्या सह नगर रचनाकार विभागाच्या कोकण आयुक्तांपर्यंत सर्व अधिकार्यांची भेट घेतली. नगरपंचायतीची भूमिका शहराच्या विकासाच्या दृष्टीने कशी योग्य आहे. आपण विकास आराखड्याचा कसा सकारात्मक विचार करत आहोत. हे पटवून दिले. नगराध्यक्षांच्या मुत्सद्देगिरीमुळे नगररचनाकार विभागाने सुधारित विकास आराखडा नगरपंचायतीला दिला. या आराखड्याला बुधवारी 8 फेब्रुवारीला नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली आहे. Development plan of Guhagar will be released
विकास आराखडा होणार प्रसिद्ध
सर्वसाधारण सभेकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे विकास आराखडा जनतेसाठी खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही प्रक्रिया नगरपंचायत प्रशासनामार्फत केली जाते. हा विकास आराखडा प्रसिद्ध करताना नागरिकांना त्याबाबत काही हरकती सूचना मांडायच्या असतील तर सुमारे एक महिन्याची मुदत दिली जाईल. तसा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने निघेल. मगच हा आराखडा प्रसिद्ध होईल. Development plan of Guhagar will be released
