• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देहदान जागृतीसाठी तिसंगकर सरसावले

by Mayuresh Patnakar
February 8, 2023
in Guhagar
148 2
0
Staged plays for body donation awareness
292
SHARES
833
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी बसवले नाटकं

गुहागर, ता. 8 : देहदानाविषयी जागृती व्हावी म्हणून गुहागर तालुक्यातील भातगांव तिसंग डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांनी दोन अंकी नाटक बसवले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात होत आहे. या नाट्यप्रयोगाला मुंबईतील गुहागरवासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भातगांव तिसंगच्या पंचऋषी उन्नती मंडळाने केले आहे. Staged plays for body donation awareness

आपण जीवंत असेपर्यंत आपल्या देहाचा उपभोग घेतो. काळजी घेतो. मात्र मृत्यूनंतर देह नष्ट करतो. त्याऐवजी या देहाचे दान केले तर दुसऱ्या एकाचे जगणे आनंददायक होऊ शकते. हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचावा म्हणून भातगांव तिसंगमधील तरुणांनी देहदान हे दोन अंकी नाटक बसवले आहे. Staged plays for body donation awareness

या नाटकाचे लेखन सागर पालवकर यांनी केले असून दिग्दर्शन सुर्यकांत पेजे व नृत्य दिग्दर्शन भालचंद्र पांचाळ  यांनी केले आहे. नाटकामध्ये किरण डिंगणकर, सुनिल डिंगणकर, अमोल डिंगणकर, विशाल डिंगणकर, विश्वास फावरे, दिपेंद्र वेलोंडे, सचिन डिंगणकर, निलेश फावरे, रंजना म्हाब्दी हे कलाकार काम करत आहेत. नाटकाची रंगभूषा रमाकांत घाणेकर, नेपथ्य अशोक पालेकर, प्रकाश योजना नितीन बैकर, पार्श्वसंगीत कल्पेश सोलकर, हार्मोनियम साथ सुरज वेले हे करत आहेत. Staged plays for body donation awareness

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या नाटकाचा पहिला प्रयोग शुक्रवारी 10 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे रात्री 8.00 वा. आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग पहाण्यासाठी मुंबईतील गुहागर तालुकावासीयांनी यावे. असे आवाहन पंचऋषी उन्नती मंडळाचे अध्यक्ष यशवंत डिंगणकर, उपाध्यक्ष अर्जुन वेलोंडे, सचिव संजय वेलोंडे, उपसचिव विश्वास डिंगणकर, खजिनदार संदिप वेलोंडे, सह खजिनदार किरण डिंगणकर, सल्लागार विनोद डिंगणकर, सह सल्लागार निलेश फावरे, दिपक फावरे व सर्व सभासद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विश्वास डिंगणकर 8689851864, राजेंद्र वेलोंडे 9702782876, दिपक फावरे 8689984955, प्रितेश वरवटकर 9702935164 यांचेकडे संपर्क साधावा. Staged plays for body donation awareness

Staged plays for body donation awareness
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStaged plays for body donation awarenessUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.