गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका चर्मकार विकास मंडळाच्या वतीने जानवळे येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देण्यात आला. मानवता हाच खरा धर्म यांची शिकवण देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे अविरत प्रवाहीत राहावा या उद्देशाने जयंती साजरी केली. Sant Shiromani Rohidas Maharaj Jayanti at Janwale

यावेळी जिल्हा सचिव संतोष पालशेतकर, गुहागर तालुका अध्यक्ष विजय जानवळकर, जिल्हा स्वीकृत सदस्य विनोद जानवळकर, माजी अध्यक्ष सुधीर कोंडविलकर, माजी अध्यक्ष बाळकृष्ण शिर्के, तेजस कोंडविलकर, अशोक जानवळकर, दिनेश जानवळकर, नथुराम जानवळकर, विश्वनाथ कोंडविलकर, सिद्धार्थ पालशेतकर, ग्रामपंचायत सदस्य वैभवी जानवळकर, शैला पालशेतकर, कल्पना जानवळकर, मंगेश कोंडविलकर, स्नेहल जानवळकर नागेश जानवळकर, दिनेश चिपळूणकर, विश्वनाथ जानवळकर, शैलेश पेवेकर, विवेक जानवळकर व समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष पालशेतकर यानी तर आभार दिनेश जानवळकर यांनी मानले. Sant Shiromani Rohidas Maharaj Jayanti at Janwale

