• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी

by Ganesh Dhanawade
February 7, 2023
in Ratnagiri
78 1
0
Mumbai to Kanyakumari Cycle Tour
153
SHARES
438
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विश्वबंधुत्वाचा संदेश घेऊन १७५० किमी प्रवास १४ दिवसात पूर्ण

दापोली, ता. 07 : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड आणि सचिन पालकर यांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १७५० किमीचा सायकल प्रवास १४ दिवसात पूर्ण केला आहे. त्यांनी २२ जानेवारी २०२३ रोजी मुंबईहुन सायकल प्रवास सुरु केला आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील गावातून सायकल प्रवास करत ते ४ फेब्रुवारी २०२३ रोजी कन्याकुमारी येथे पोहोचले. Mumbai to Kanyakumari Cycle Tour

Mumbai to Kanyakumari Cycle Tour

त्यांनी ही सायकल मोहीम सोबत कोणतीही बॅकअप गाडी न घेता केली आहे. स्वतःचे साहित्य स्वतःच्या सायकलवर घेऊन दररोज ८० ते १७० किमी अंतर सायकल चालवली. याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, दैनंदिन धावपळीच्या जीवनात ऑफिस नोकरी सुरु असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढून ही १४ दिवसाची सायकल मोहीम आखली गेली. मार्गावरील नवीन प्रदेश, तिथली संस्कृती, जीवनशैली यांचा अनुभव आस्वाद घेण्यासाठी सायकल प्रवास हा एक चांगला पर्याय आहे. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून स्वागत पाहुणचार झाला. पर्यावरण रक्षण, सायकलचे महत्व, स्वामी विवेकानंदानी जगाला दिलेला बंधुत्वाचा संदेश याबद्दल प्रबोधन चर्चा जनजागृती करत आणि अनेक स्थानिक विषयांवर गप्पा गोष्टी करत हा आनंददायी असा, न विसरता येणारा सायकल प्रवास झाला. अनेक नवीन माणसे जोडली गेली, नवीन मित्र मिळाले. Mumbai to Kanyakumari Cycle Tour

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

दापोली आंबवली गावातील सुरज भुवड वय २५ हा आयआयटी मुंबई येथे नोकरीस असून प्रभादेवी येथील सचिन पालकर वय ४३ यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. घरच्यांचा पाठिंब्यामुळेच अशा आव्हानात्मक सायकल मोहीमेचे नियोजन शक्य झाले असे त्यांचे म्हणणे आहे. ही सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. Mumbai to Kanyakumari Cycle Tour

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMumbai to Kanyakumari Cycle TourNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.