गुहागर, ता. 07 : नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन व गुणगौरव सोहळा घेण्यात आला. हा सोहळा रविवारी पुणे येथे संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे संपन्न झाले. Gift of the book to Gnanarashmi Library

सदर पुस्तकाची प्रत श्री .सतिश पांडुरंग मुणगेकर जि.प.पू.प्रा. केंद्रीय शाळा झोंबडी नं .१ येथील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांनी ज्ञानरश्मी वाचनालय गुहागरला भेट दिली. मुणगेकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे संघटक तसेच आविष्कार फाऊंडेशन इंडीया तालुका शाखा गुहागरचे अध्यक्ष म्हणून काम करतात. Gift of the book to Gnanarashmi Library
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी SCERT चे उपसंचालक रमाकांत काठमौरे, माजी उपसंचालक विकास गरड, उपप्रशासकीय अधिकारी पुणे म.न.पा. शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर साहेब, विजय आवारे, शिवाजी खांडेकर संचालक राष्ट्र सेवा दल पुणे, मा.सचिन डिंगळे, मा.बाळकृष्ण चोरमले, राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक उपस्थित होते. Gift of the book to Gnanarashmi Library

