• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युवा महोत्सवामुळेच राजकारणात यशस्वी; मंत्री उदय सामंत

by Mayuresh Patnakar
February 6, 2023
in Guhagar
59 1
0
A party is a means of working
116
SHARES
331
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पक्ष हे काम करण्याचे माध्यम

गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working

रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्‌घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means of working

Shore Youth Festival

हाच धागा पकडून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरवात युवा महोत्सवापासून झाली. बहरमधुन अनेक कलाकार आम्ही राज्यातील सांस्कृतिक, कला क्षेत्राला दिले. त्याचबरोबर विकासाची कामे आम्ही सुरु केली.  सामाजिक क्षेत्रात काम करताना ज्यावेळी आपण ठसा उमटवतो त्यावेळी आपले विरोधकही तयार होत असतात. मी वयाच्या 28 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा लढवली. तेव्हा बहरच्या माध्यमातून नाचगाण्याचे कार्यक्रम करणारा आणि क्रिकेट खेळणार आमदार कसा असु शकतो असा अपप्रचार माझ्याच काही मित्रांनी सुरु केला. परंतु बहर आणि क्रिकेटमधुन व्यासपीठ दिले त्या तरुणाईनेच उठाव केला आणि मला आमदार केले. A party is a means of working

राजकीय टोलेबाजी

एखादा युवक चांगले काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आलेच पाहीजे. ही भुमिका सर्वांनीच घेतली पाहीजे. राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे.  गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. A party is a means of working

साहिलकडे नेत्तृत्त्वगुण

लोकनेते, माजी सभापती सदानंद आरेकर यांच्या राजकीय, सामाजिक कार्याचा वसा उत्तम प्रकारे साहिल आणि त्याचे सहकारी पुढे घेऊन जात आहे.  पद्माकर आरेकर यांनी साहीलला आमच्या ताब्यात दिला तर निश्चितच त्याला सभापती बनवु शकतो. भविष्यामध्ये साहील नेतृत्त्व करु शकतो. एवढे गुण त्यांच्यात आहेत.  युवा महोत्सव भरवला म्हणजे जबाबदारी संपत नाही. पालकमंत्री या नात्याने मी साहीलला शब्द देतो की, युवकांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली विकासाची कामे आपण माझ्याकडून करुन घ्यावीत. A party is a means of working

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

24 तासांच्या आत त्यावर सही करेन

साहिल आरेकर आणि त्यांच्या सहकारी गुहागर नगरीत प्रवेश करतात तिथे स्व. लोकनेते सदानंद आरेकर यांच्या नावाने प्रवेशद्वार उभे करण्याची मागणी ठेवली आहे. जर गुहागरमधील सर्वांची या प्रस्तावाला संमत्ती असेल तर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदारांनी तसा प्रस्ताव माझ्याकडे पाठवावा. पालकमंत्री म्हणून प्रस्ताव आल्यावर 24 तासांच्या आत त्यावर सही करेन. असे आश्र्वासन मंत्री सामंत यांनी दिले. A party is a means of working

नोकरी महोत्सवाचे आमंत्रण

12 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 127 कंपन्या या महोत्सवात नोकऱ्या देण्यासाठी सहभागी होत आहेत. इयत्ता 5 वी पासून ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सर्वांनी या महोत्सवाला यावे. असे आवाहन यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. A party is a means of working

यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, पद्माकर आरेकर, नुकतेच शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे पदाधिकारी निलेश मोरे, मुन्ना देसाई, अमोल गोयथळे, अमरदीप परचुरे, आदी उपस्थित होते. A party is a means of working

Tags: A party is a means of workingGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.