• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

किनारा युवा महोत्सवचा शानदार शुभारंभ

by Ganesh Dhanawade
February 6, 2023
in Guhagar
87 1
0
Shore Youth Festival
171
SHARES
489
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित

गुहागर, ता. 06 : येथील लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित किनारा युवा महोत्सव २०२३ चा आमदार शेखर निकम व गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आला. Shore Youth Festival

Shore Youth Festival

यावेळी आ. शेखर निकम यांनी लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान तसेच प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर याचे युवा महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल भरभरून कौतुक केले. गुहागर गाव हे सुंदरतेने नटलेले कोकणातील उत्तम पद्धतीचे गाव आहे. गुहागरात अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून व्यासपीठ दिले जात आहे. राजकारण करत असताना फक्त राजकारण करत न बसता समाजाचे हितही जपले गेले पाहीजे. फक्त एका दिवसाचे राजकारण करून एरव्ही अन्य दिवशी परिसरातील विकासकामे करणे गरजेचे आहे. जनहितार्थ काम करणे तेवढेच महत्वाचे आहे. Shore Youth Festival

Shore Youth Festival

कार्यक्रमाच्या प्रस्थाविकेमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर यांनी किनारा युवा महोत्सव आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. गुहागर तालुक्यासाठी ज्यांचे मोलाचे योगदान लाभले ते माजी आमदार स्व. तात्यासाहेब नातू, माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल, माजी आमदार म. स. केसरकर, माजी सभापती स्व. सदानंद आरेकर, कुणबी समाज नेते स्व. अर्जुनराव भागडे यांचे तालुक्यासाठी असलेले योगदान यापुढेही सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील असे सांगितले. Shore Youth Festival

Shore Youth Festival

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रो कब्बडी खेळाडू ऋतुराज कोरावी तसेच फूटबॉलपटू शुभम खानविलकर या खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच लोकनेते स्व. सदानंद गोविंद आरेकर युवा पुरस्कार प्रथमेश परांजपे याला देण्यात आला. तर स्व. मदनशेठ गोविंद आरेकर गुहागर तालुका क्रीडा भूषण पुरस्कार आबलोली येथील अनुज साळवी याला प्रदान करण्यात आला. या युवा महोत्सवामध्ये लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, संगीत मैफिल, लावणी नृत्याविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश आरेकर व दीपक देवकर यांनी केले. कार्यक्रम पाहण्यासाठी गुहागर वसियानी मोठी गर्दी केली होती. Shore Youth Festival

Shore Youth Festival

यावेळी गुहागर ता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद्माकर आरेकर, नगराध्यक्ष राजेश बेंडल, खातू मसाले उद्योगचे मालक शाळीग्राम खातू, भंडारी समाज ज्ञाती अधिकारी अमोल वराडकर, मोहन बागकर, चिपळूण अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक अजय खातू, स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर कार्याध्यक्ष साहिल आरेकर, नगरसेवक अमोल गोयथळे, मंदार कचरेकर, मानसी शेटे, सागर मोरे, नितीन गोयथळे, मनोज बावधनकर, तुषार सुर्वे आदी उपस्थित होते. Shore Youth Festival

Shore Youth Festival
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShore Youth FestivalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.