• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दाभोळ येथे शिवजयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

by Mayuresh Patnakar
February 4, 2023
in Ratnagiri
100 1
0
Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol
197
SHARES
562
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे आयोजन

गुहागर, ता. 04 : दाभोळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त हिंदू गर्जना प्रतिष्ठान दाभोळच्या वतीने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खुली भव्य मॅरेथॉन स्पर्धा, मोटर सायकल रॅली, महिलांसाठी हळदीकुंकू, ऐतिहासिक वेशभूषा, व्याख्यान इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol

शिवजयंती उत्सवानिमित्त दि. 12/02/2023 रोजी स. 8 वा. धोपावे फेरीबोट ते गोपाळगड अशी खुली भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 15 वर्षापुढील स्पर्धकांनी भाग घ्यावा. तसेच स्पर्धकांनी आपली नाव दि. 10/02/2023 पूर्वी नोंदणी करावीत. नाव नोंदणीसाठी श्री नितीन यादव 9975839121, श्री. सिध्देश वैद्य 9763866999, श्री. परेश गुजराथी 9527194611, श्री. मनिष मोरे 9404335567, श्री. रोहन केलसकर 9764610510 याचेकडे संपर्क साधण्यात यावा. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 10000/- व्दीतीय क्रमांक 7000/- तृतीय क्रमांक 5000/- आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol

दि. 18/02/2023 रोजी दुपारी 3 वा. सिमेवरील गणपती मंदिर येथून मोटर सायकल रॅली सुरु होऊन भाटी व पुन्हा तिकडून येऊन जुने पोलीस स्टेशन, भंडारवाडा ते लोकमान्य टिळक विद्यालयाच्या प्रांगणात समाप्त होईल. त्यानंतर सायं. 5 ते 6.30 वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. सायं 6.30 वा लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळचे पटांगणात लहान मुलांचे ऐतिहासिक वेशभूषा प्रदर्शन घेण्यात येणार आहे. व त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे 9 वे वंशज, श्री शिवाजीराजे रायगड स्मारक मंडळाचे  अध्यक्ष व किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे  सदस्य श्री. रघुजीराजे आंग्रे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol

टिप – सर्व मोटार सायकल चालकांचे लायसन्स व गाडीचे कागदपत्र सोबत असावीत. तसेच मोटार सायकलवर दोघांव्यतिरिक्त कुणाला बसवू नये. सोबत झेंडे आणावेत.

दि. 19/02/2023 रोजी स. 8.30 वा सिमेवरील गणपती मंदिरामध्ये श्रींचे पुजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर स. 9 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी शिवप्रेमींनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अशी विनंती हिंदू गर्जना प्रतिष्ठान दाभोळच्या वतीने करण्यात आली आहे. Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarProgram on the occasion of Shiv Jayanti at DabholUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet49
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.