रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे जीएसटी अपील, न्यायनिवाड्याची पद्धती, सर्टिफिकेशन रिपोर्ट यावर चर्चासत्राचे आयोजन हॉटेल सी फॅन्स येथे करण्यात आले होते. या चर्चासत्राला रत्नागिरीतील सीएंचा चांगला प्रतिसाद मिळाला. Seminar by CA Branch at Ratnagiri

यावेळी सीए वैभव देवधर यांनी जीएसटी कायद्याअंतर्गत सर्च, सीझर व अटक यासंदर्भातील तरतुदी विषद केल्या. देवधर यांनी जीएसटी विभाग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या निर्णयांचा उहापोह या व्याख्यानात केला. मुंबई येथील सीए सुश्रुत चितळे यांनी सीएंना द्याव्या लागणाऱ्या विविध सर्टिफिकेशन्स संदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत मार्गदर्शन केले. ही सर्टिफिकेशन्स देताना घ्यावयाची काळजी व त्यांची रचना यावर सखोल विवेचन केले. Seminar by CA Branch at Ratnagiri

दुपारच्या सत्रात सीए चैतन्य वैद्य यांनी जीएसटी कायद्यातील अॅडज्युडिकेशन प्रक्रिया व अपील यावर बहुमोल मार्गदर्शन केले. जीएसटी कायदा तसेच नियम समजावून सांगतानाच त्यांनी जीएसटी डिपार्टमेंट व न्यायालयाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर प्रकाश टाकला. यावेळी सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, उपाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, सचिव सीए अक्षय जोशी, खजिनदार सीए केदार करंबेळकर, विकासा चेअरमन सीए अभिलाषा मुळ्ये, समिती सदस्य सीए शैलेश हळबे उपस्थित होते. सीए अक्षय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. Seminar by CA Branch at Ratnagiri

