रेल्वेमधील चोरीच्या गुन्ह्यात संशयीतासह मुद्देमाल हस्तगत
गुहागर, ता. 02 : वैभववाडी पोलीस ठाणे, जिल्हा सिंधुदुर्ग येथून चिपळूण पोलीस ठाणे येथे एक रेल्वेमधील चोरीचा गुन्हा प्राप्त झाला होता. ज्यामध्ये फिर्यादी ह्या, दि. 3 डिसेंबर 2022 रोजी तुतारी एक्सप्रेस ने दादर ते वैभववाडी असा प्रवास करत असताना, सकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास, चिपळूण रेल्वे स्थानकाजवळ फिर्यादी या गाढ झोपेत असताना एका इसमाने त्यांची पर्स चोरून नेली होती. ज्यामध्ये त्यांचा एक वापरता मोबाईल, ₹20,000/- रोख रक्कम, व ₹7,00,000/- किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील गितेश अशोक पवार याला ताब्यात घेण्यात आले आहे. One arrested from Guhagar Kotaluk

या शून्य क्रमांकाने प्राप्त गुन्ह्याची, लगेचच दखल घेऊन चिपळूण पोलीस ठाणे येथे भा.द.वि. संहिता कलम 379 अन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला. व चिपळूण पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच एक पथक तयार करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. अरमाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत पारंपरिक तपास पद्धतीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यामधील आरोपी गितेश अशोक पवार (रा. कोतळूक, गुहागर) याला ठाणे जिल्ह्यातून दि. 31 जानेवारी 2023 रोजी ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपीकडून, गुन्ह्यामधील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 100% मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. One arrested from Guhagar Kotaluk

सदरील कारवाईमध्ये चिपळूण पोलीस स्थानकाचे उप निरीक्षक श्री. अरमाळकर, परीक्षेत्र पोलिस उपनिरिक्षक श्री. पाटील, पोलिस नाईक नाईक, पोलिस नाईक पांचाळ, पोलिस शिपाई दराडे, पोलिस शिपाई पडवी यांचा समावेश होता. One arrested from Guhagar Kotaluk
