गुहागर, ता.02 : “जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान” या योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरुन इस्त्रो व नासा या संस्थेमध्ये परिक्षणासाठी गुहागर काजुर्ली शाळेची विद्यार्थीनी कु. सोनाली मोहन डिंगणकर हिची निवड झाली आहे. तिला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर या समाज संघटनेच्या वतीने रोख रक्कम पंचवीस हजार रुपये व उद्योजक भालचंद्र जोगळेशेठ यांचेकडून रोख रक्कम पाच हजार रुपये असे एकुण रक्कम तीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. Financial help to Sonali by Kunbi Sangh


ही आर्थिक मदत काजुर्ली येथील कु. सोनाली मोहन डिंगणकर हिच्या घरी जाऊन देण्यात आली. यावेळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीचे आणि पालकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागरचे तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपाध्यक्ष पांडूरंग पाते, सरचिटणीस तुकाराम निवाते, प्रदिप बेंडल, अनंत पागडे, संदिप पाष्टे, काजुर्लीच्या सरपंच रुक्मिणी सुवरे, आबलोलीच्या माजी सरपंच श्रावणी पागडे, शंकर जोशी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. Financial help to Sonali by Kunbi Sangh