• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर झगडे यांचे व्याख्यान

by Ganesh Dhanawade
February 1, 2023
in Ratnagiri
129 1
0
Lectures by senior literati Zagade
253
SHARES
724
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

असुर्डे विद्यालयात ‘छप्पर सोन्याचे’ या काव्य संग्रहावर व्याख्यान

गुहागर, ता. 01 : सह्याद्री शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे, आंबतखोल या विद्यालयात स्व. गोविंदरावजी निकम जयंती साजरी करण्यात आली. या महोत्सवानिमित्त व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफण्यासाठी गुहागर असगोलीचे ज्येष्ठ साहित्यिक श्री. ज्ञानेश्वर झगडे उपस्थित होते. Lectures by senior literati Zagade

यावेळी श्री. ज्ञानेश्वर झगडे यांनी त्यांच्या ‘छप्पर सोन्याचे’ हा काव्य संग्रह तसेच मराठी साहित्यातील सर्व प्रकार यांच्या विषयी सखोल आणि सविस्तर माहिती सांगितली. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता, चारोळी, विनोद, चुटके, भारुड, अभंग, भजन इ. मराठी साहित्याचा परिचय करून दिला. तसेच अनेक यशस्वी अपंग व्यक्तींची उदाहरणे सांगून व्यंगावर मात करून यश संपादन करण्याचे आवाहन केले. डॉ. कलाम यांनी गौरव केलेली मनश्री सोमण तसेच श्रीम. गीता, श्री. काटकर यांची प्रेरणादायी उदाहरणे सांगितली. ‘आम्ही कोकणचं राजं’ ‘सावित्रीआई’ ‘पाऊस’ ‘रोहिणी’ ‘छप्पर सोन्याचं’ ‘कारगिल’ ‘स्वच्छता’ ‘बाप’ इत्यादी कवितांचे गायन अत्यंत उत्तम प्रकारे सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. Lectures by senior literati Zagade

Lectures by senior literati Zagade

या कार्यक्रमात सौ. सुरभी मोहिरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तर श्री. बी. एस. देसाई यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. फुटक, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. Lectures by senior literati Zagade

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLectures by senior literati ZagadeMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.