• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पंचायत समितीचा कलाविष्कार कार्यक्रम संपन्न

by Ganesh Dhanawade
February 1, 2023
in Guhagar
172 2
0
Program in Guhagar Panchayat Samiti

कलाविष्कार कार्यक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचारी

339
SHARES
968
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अधिकारी व कर्मचारी यांनी सादर केली आपली कलाकारी

गुहागर, ता. 01 : पंचायत समिती अंतर्गत कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विविध कलाविष्कार सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी, नाटिका, समुहनृत्य, शेतकरी नृत्य सादर करण्यात आले. Program in Guhagar Panchayat Samiti

या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. या कार्यक्रमात गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी “मेरे सपनोंकी रानी कब आओगी तुम'” हे गीत गायले, या गायलेल्या गीतावर सर्व कर्मचाऱ्यानी ठेका धरला होता. महाविद्यालयीन जीवनानंतर कधीही ज्यांना स्टेजवर गायनाची व नृत्य करण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी प्राप्त झाली. गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व अवधुत राऊतराव यांच्यासह कर्मचाऱ्यानी गायलेल्या गाण्यानीही उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातून रेकॉर्ड डान्स, शेतकरी नृत्य, नाटिका, पोवाडा, समुह नृत्य, दिंडी नृत्य, भूपाळी आदी कार्यक्रमांनी सांस्कृतिक कार्यक्रम बहरून निघाला होता. Program in Guhagar Panchayat Samiti

नाटिकामधुन समाजप्रबोधन, कोरोना काळातील परिस्थिती व त्याला संघर्ष करणारा शासकीय कर्मचारी आदींचे सादरीकरण सर्वानाच भावले. तसेच वैयक्तिक जुन्या गाण्यांची मेजवानी सादर करण्यात आली. या कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळाला. पंचायत समितीतील विविध विभागातील कर्मचाऱ्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा, एकमेकांप्रती स्नेह समन्वय निर्माण होऊन आपलेपणाची भावना निर्माण व्हावी व निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे वर्षभर कार्य, सस्कृती रुजावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले होते. Program in Guhagar Panchayat Samiti

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमात पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे, महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, उपअभियंता आनंद आचार्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत झगडे, सचिव शर्वरी सोलकर, सहसचिव मिनेश धुमाळ, कोषाध्यक्ष मिलिंद कदम, सहकोषाध्यक्ष वैभव कदम, सदस्य विवेक जोशी, बाबासाहेब राशिनकर, अपूर्वा हुमणे, अरविंद पालकर, अशोक गावणकर आदी उपस्थित होते. या कलाविष्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पाटील, विकास पाटील, दीपक साबळे, स्वाती चाफे तर आभार प्रदर्शन अवधूत राऊत राव यांनी केले. Program in Guhagar Panchayat Samiti

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarProgram in Guhagar Panchayat SamitiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.