गुहागर, ता. 30 : तालुक्यातील शीर येथील आरपीआय जिल्हा प्रवक्ते आणि तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अनंत विठ्ठल पवार यांचे शुक्रवारी डेरवण येथील वालावालकर रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 55 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. RPI spokesperson Anant Pawar is No More
अनंत पवार यांनी पत्रकारीतेपासून कामाला सुरूवात केली. कोकणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काम सुरु झाल्यावर त्यांनी आरपीआय राजकीय पक्षात उडी घेतली. आरपीआयचे धडाडीचे कार्यकर्ते तसेच जिल्हा प्रवक्ते म्हणून ते कार्यरत होते. शीर गावांमधील विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सुरूवातीला ते शिवसेनेचे काम करत होते. शिरचे माजी ग्रामपंचायत सदस्य शीर तंटामुक्त समिती अध्यक्ष, शीर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, बौध्दजन सहकारी संघ गुहागर माजी चेअरमन, पांडुरंग रूपाजी फटकरे संचलित जनता शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आदी विविध पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर शनिवारी दुपारी दोन वाजता शिर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. RPI spokesperson Anant Pawar is No More