गुहागर हायस्कूलसाठी सन 1975 चे विद्यार्थी श्री. गद्रे यांचेकडून साहित्य भेट
गुहागर, ता. 30 : दान देताना हातचे राखून न देता सढळ हस्ते द्यावे, याकरता दानशुर कर्ण आपला आदर्श असावा, असे प्रतिपादन श्री. मुकुंद गणेश गद्रे यांनी केले. गुहागर हायस्कूलमध्ये समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. गद्रे यांनी गुहागर हायस्कूलला प्रोजेक्टर, स्क्रीन, लॅपटॉप आदी डिजीटल रूमचे साहित्य भेट दिले. Gift from Gadre for Guhagar High School

ते पुढे म्हणाले कि, कोणतेही काम अथवा क्षेत्र कमी जास्त महत्वाचे नसते. तर आपला दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांनी या आपल्या संस्कार दशेतच आपले आदर्श व्यक्तीमत निवडले पाहीजेत. गुहागर हायस्कूलचे 1975 चे एसएससी बॅचचे विद्यार्थी असलेले श्री. मुकुंद गणेश गद्रे यांनी गुहागर हायस्कूलमध्ये प्रोजेक्टर, स्क्रीन, लॅपटॉप आदी डिजीटल रूमचे साहित्य भेट दिले. Gift from Gadre for Guhagar High School
या समारंभाला गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संदिप भोसले, शालेय समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर, संचालक पराग भोसले, ज्योती परचूरे, 1975 चे एसएससी बॅचे माजी विद्यार्थी राजेंद्र आरेकर, रमेश बारटक्के, नंदकुमार ढेरे, शरदचंद्र सोमण, श्री उदेग, ओंकार गद्रे, श्री कॉम्पूटर गुहागरचे मोरे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पर्यवेक्षक विलास कोरके, दिलीप मोहिते, सोनाली हळदणकर, मनीषा सावंत व विद्यार्थी उपस्थित होते. Gift from Gadre for Guhagar High School


