• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न

by Mayuresh Patnakar
January 28, 2023
in Guhagar
133 2
0
National Voter's Day celebrated in KDB college

मतदान-दिवस-निमित्त-विद्यार्थिनीनी-काढलेली-रांगोळी

263
SHARES
752
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तहसिल कार्यालयामार्फत रांगोळी व निबंध स्पर्धेमध्ये सहभागींना प्रमाणपत्र

गुहागर, ता. 28 :  खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) DLEE व इतिहास विभागातर्फे दि. २५ जानेवारी २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विराज महाजन, गुहागर तहसिलदार मा. प्रतिभा वराळे, DLEE विभागाचे प्रा. प्रमोद आगळे व इतिहास विभागाच्या सौ. रश्मी आडेकर उपस्थित होत्या. National Voter’s Day celebrated in KDB college

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. रश्मी आडेकर यांनी लोकशाही यशस्वी करणे व ती टिकविणे यासाठी पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जागृत करण्याची गरज असल्याचे विषद केले. तसेच यावर्षी महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोग SVEEP–(Systematic Voters’Education and Elector Participation) या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. National Voter’s Day celebrated in KDB college

National Voter's Day celebrated in KDB college
राष्ट्रीय-मतदार-दिवस-निमित्त-काढलेली-रांगोळी

गुहागर तालुक्याच्या तहसिलदार मा. प्रतिभा वराळे यांनी विद्यार्थ्यामध्ये अजूनही संविधानिक अधिकाराविषयी जागृती नसल्याने निवडणूक आयोगाने हा दिवस साजरा करीत असून हा अधिकार मिळविण्यासाठी योग्य ती पात्रता पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्याना केले. सुशासन व कार्यक्षम लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे हे स्पष्ट केले. National Voter’s Day celebrated in KDB college

यानंतर तहसिल कार्यालयातील कर्मचारी श्री. प्रवीण सावंत यांनी तहसिल कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेमध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय व खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात सहभागींना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. National Voter’s Day celebrated in KDB college

National Voter's Day celebrated in KDB college
विद्यार्थिनीला-प्रशस्तीपत्रक-देताना-मा.तहसिलदार

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना लोकमताची ताकत काय असू शकते हे इस्त्रायलच्या संसदेचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. मतदान करताना कोणत्या स्तरासाठी कोणत्या समस्या आहेत ते लक्षात घेऊन सल्ला दिला. लोकशाही, सुशासन व निवडणुका यासाठी सूज्ञ मतदार निर्माण करण्यासंदर्भात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याचा मनोदय जाहीर केला. यावेळी महाविद्यलायातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, तहसिल कार्यालयातील कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. प्रमोद आगळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. National Voter’s Day celebrated in KDB college

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational Voter's Day celebrated in KDB collegeNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share105SendTweet66
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.