साखरीआगर कातळवाडी येथील घटना
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील साखरीआगर कातळवाडी येथील ९ वर्षाच्या बालकाने खेळताखेळता घरात पडलेले जेली चॉकलेट खाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी या बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Child dies after eating chocolate

साखरीआगर कातळवाडी येथील प्रमोद तेरेकर यांचे ९ महिन्याचे बाळ बुधवार दि. २५ जानेवारी रोजी घरामध्ये खाली जमिनीवर खेळत होते. याचवेळी जमिनीवर पडलेले जेली चॉकलेट तोंडात घातल्याने सदरील चॉकलेट घाशामध्ये अडकले. हे जेव्हा घरच्यांच्या लक्षात आले असता बाळाला दवाखान्यात उपचारसाठी नेत असतानाच वाटेत निधन झाले. प्रमोद तेरेकर यांना हे पहिलेच बाळ झालेले होते. तेरेकर हे मुंबईत कामासाठी असतात. हा प्रकार समजताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे करत आहेत. Child dies after eating chocolate
