गुहागर, ता. 27 : इव्हीएम द्वारे होणाऱ्या निवडणूकांची यंत्रणांना सवय आहे तथापि शिक्षक संघातील निवडणूक कामकाज सर्व नियम व शिस्त पाळून करा, अशा सूचना कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक विशाल सोलंकी यांनी दिल्या. The inspectors reviewed the constituency
निवडणूक बाबत करण्यात आलेले नियोजन आणि तयारी याचा आढावा विशाल सोलंकी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. शिक्षक मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत आतापर्यंत झालेले कामकाज तसेच प्रत्यक्ष मतदान दिनाची तयारी, मतदान केंद्राचे नियोजन, वाहतूक व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या निवडणुकीत लागणाऱ्या बंदोबस्ताबाबत माहिती दिली. The inspectors reviewed the constituency
कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हयात 17 मतदार केंद्र असतील. जिल्हयातील शिक्षक मतदारांची संख्या 4120 आहे. मतमोजणी विभागीय स्तरावर एकत्र होईल. या मतदार संघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदूर्ग जिल्हयातील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. The inspectors reviewed the constituency

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी (प्र.) शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांतधिकारी विकास सुर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होते. इतर ठिकाणचे सर्व प्रांत तसेच तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. The inspectors reviewed the constituency
तालुका निहाय मतदान केंद्राची संख्या
मंडणगड -1, दापोली-1, खेड-1, चिपळूण- 4, गुहागर-1, संगमेश्वर-3, रत्नागिरी-2, लांजा-1 आणि राजापूर-3. जिल्हयात एकूण 4120 मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 2742 असून स्त्री मतदार संख्या 1378 आहे. The inspectors reviewed the constituency
