गुहागर, ता. 26 : सामाजिक कार्यात कायम भाग घेणारे आणि दुस-यांच्या मदतीला धावून जाणारे आबलोलीचे सुपूत्र, हॉटेल व्यावसायिक प्रमोद अनंत भंडारी यांना नुकताच राज्यस्तरीय कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पूरस्कार पारस काव्य, कला, जनजागृती संस्था ( रजि.) सानपाडा नवी मुंबई या संस्थेकडून देण्यात आला. Konkanratna Award to Pramod Bhandari

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील प्रमोद भंडारी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी सन १९९२ ते १९९४ पर्यंत आबलोलीतील डि. एड्. कॉलेजच्या विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत केली. या सामाजिक कार्याबद्दल प्रमोद भंडारी यांना २०२२ चा राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे. कोकणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गुहागर तालुक्यातून सर्वच स्तरामधून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Konkanratna Award to Pramod Bhandari
