• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दादा इदाते यांना पद्मश्री जाहीर

by Mayuresh Patnakar
January 26, 2023
in Ratnagiri
237 2
0
Padmashri Award announced to Dada Idate

महाराष्ट्रातील भटक्या जातीतील महिलेचा सत्कार करताना दादा

466
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद

गुहागर, ता. 26 : भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री जाहीर केलं आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराने  संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची शान उंचावली आहे. 25 जानेवारीला सायंकाळी उशीरा दादांना पद्मश्री मिळाल्याचे समजले. Padmashri Award announced to Dada Idate

टेटवली, ता. दापोली येथे दादांचा (भिकुजी इदाते) जन्म 2 जून 1949 मध्ये झाला. सध्या दादा  दापोलीतील जालगाव येथे राहतात. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. संघात शाखेचा गटनायक, जिल्हा कार्यवाह, 15 वर्ष महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह, क्षेत्रीय (महाराष्ट्र व गुजराथ) बौद्धीक प्रमुख, सामाजिक समरसता विषयाचे अखिल भारतीय संयोजन अशा विविध जबाबदार्‍यांवर दादांनी काम केले. 1999 मध्ये महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती अभ्यास व संशोधन समितीचे दादा अध्यक्ष होते. भटके व विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालयासह त्यांनी सुचविलेल्या अनेक शिफारसी महाराष्ट्र सरकारने स्विकारल्या. राज्य मागासवर्ग आयोगाचे दोन वेळा सदस्य व सहा महिने हंगामी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.  2010 मध्ये मुंबई विद्यापीठाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून जानेवारी 2015 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. तसेच मा. पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नेमेलेल्या उच्चाधिकारी समितीचे दादा सदस्य होते. Padmashri Award announced to Dada Idate

Padmashri Award announced to Dada Idate
दोन समाजसेवाव्रतींची भेट – सिंधुताई सपकाळ व दादा

वंचितांचे मायबाप – श्री. भिकुजी (दादा) इदाते

अशा प्रतिष्ठेच्या पदांवर काम करताना स्वच्छ चारित्र्याची प्रतिमा, पारदर्शकता प्रसिध्दीपराङमुख दादांनी जोपासली. या पदांमुळे त्यांच्या राहणीमानात, जीवनमानात कोणताही बदल झाला नाही. अनेक सत्कार, पुरस्कार, मान सन्मान त्यांना मिळाले. पण या कर्मयोग्याने त्यात स्वत:ला गुंतवून न ठेवता आपला कर्मयज्ञ सुरू ठेवला आहे. Padmashri Award announced to Dada Idate

जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी दापोली शरद पवार आणि तहसीलदार वैशाली पाटील यांनी नुकतेच पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या दादा इदातेंचं अभिनंदन केले. जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून पद्मश्री दादा इदाते यांचे अभिनंदन केले. दादा  इदाते यांना पद्मश्री जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. Padmashri Award announced to Dada Idate

वंचितांचे मायबाप – श्री. भिकुजी (दादा) इदाते
(दादांच्या कार्याचा परिचय होण्यासाठी वरील लेख वाचावा.)

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPadmashri Award announced to Dada IdateUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share186SendTweet117
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.