• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणी खाद्य महोत्सवाच्या शुभारंभी ५ रोजी शोभायात्रा

by Ganesh Dhanawade
January 25, 2023
in Ratnagiri
66 0
0
Inauguration Procession of Konkani Food Festival
129
SHARES
368
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने दि. ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सव संपन्न होणार आहे. याच्या शुभारंभी दि. ५ रोजी शहरातून पवन तलाव येथून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच  श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात हा महोत्सव होणार आहे. Inauguration Procession of Konkani Food Festival

ही शोभायात्रा ५ रोजी सकाळी ७.३० वाजता पवन तलाव मैदानातून सुरू होईल. पुढे ती नगरपरिषदेकडून शिवनदीमार्गे वडनाक्यातून जुना कालभैरव देवस्थान अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात महोत्सवस्थळी पोहोचेल. या शोभायात्रेत शहर परिसरातील सुमारे बारा हायस्कूल, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, शहरातील विविध मंडळे, लोककलाकार पारंपारिक वेषात विविध मुखवटे, डेरा, वारकरी, ढोलपथके, मैदानी खेळ आदींसाठी सुमारे पंधरा गावातील लोककलाकार सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या शोभायात्रेत पराग ओक यांचा वराह अवतार, खेड तालुक्यातील सात्विक- आयणी गावचे टिपरी नृत्य, शिरगावमधील श्री व सौ मनोहर धागडे हे वारकरी संप्रदायाचे सर्वात उंच जोडपे, संदीप जाधव विविध मुखवटे, कामथे येथील ठसाळे यांचा डेरा, ओमळी येथील गोंधळी, सावर्डे आर्ट कॉलेज येथील बारा बलुतेदार कलाकार, उंदीर, घोडा, रेडा, रावण, संकासूर, नटवा, गणपती, कोबडा, नमन, भारूड, मंगळागौरी, फुगड्या, मैदानी खेळ, ढोलपथके आदी शोभायात्रेची भव्यता वाढवणार आहेत. Inauguration Procession of Konkani Food Festival

पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवाच्या शुभारंभी ५ रोजी शहरातून पवन तलाव येथून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन लोककला महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन शोभायात्रा विभागप्रमुख शिवाजी शिंदे, समीर शेट्ये यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8788500656 येथे संपर्क साधावा. Inauguration Procession of Konkani Food Festival

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration Procession of Konkani Food FestivalLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet32
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.