‘समाज जोडो’ अभियानात सामील व्हा ; राजेश सोनपरोते
गुहागर, ता. 25 : आपण ज्या जातीत जन्माला आलो, ज्या जातीच्या भरोशावर अधिकारी – कर्मचा-यांनी आपलं आयुष्य घडवलं. त्या जातीचं आपल्यावर ऋण आहे. त्या जातीचे थोडं तरी काम कोणत्याही मोबदल्याशिवाय कर्मचारी व सेवानिवृत्तांनी करण्यासाठी ऑफ्रोहच्या ‘समाज जोडो’ अभियानात सामील व्हा, असे आवाहन ऑफ्रोह चे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते यांनी केले. Annual General Meeting of Afroh’ concluded

ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) जिल्हा शाखा सांगलीची वार्षीक सर्वसाधारण सभा येथील दि सांगली सॅलरी को.ऑ. सोसायटीच्या सभागृहात नुकताच पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून सोनपरोते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ऑफ्रोहचे प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनिकर, कोळी समाजाचे नेते हिम्मतराव कोळी, पुणे विभाग प्रमुख भारती धुमाळ , महिला आघाडीच्या सहसचिव वनिता नंदनवार,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.अंजनी माने, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नरेंद्र पराते, पुणे जिल्हा सचिव अभय जगता, सातारा जिल्हा सचिव वनदेव थिगळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष मश्चिंद्र माने, कोल्हापूर जिल्हा सचिव रविंद्र हेडाऊ, कोल्हापूर जिल्हा संघटक रमेश वरुडकर, सतीश नंदनवार, शरद गोलाईत इत्यादी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व पुणे येथुन ऑफ्रोह चे जिल्हा पदाधीकरी देखील हजर होते. Annual General Meeting of Afroh’ concluded
सदर सभेचे प्रास्ताविक सांगली जिल्हा शाखेचे सचिव अजय भानूसे यांनी केले तर जिल्हा संघटनेची वाटचाल व वार्षीक ताळेबंद जिल्हाध्यक्ष संजयकुमार कोळी यांनी सादर केला. प्रमुख पाहुणे ऑफ्रोह चे प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी ऑफ्रोह च्या स्थापनेपासूनचा संघर्षमय लढा उदाहरणासह मांडला. कोळी समाजाचे नेते हिम्मतराव कोळी यांनी ऑफ्रोह ला कायम सहकार्याची भूमिका व्यक्त केली.तर पुणे विभाग प्रमुख भारती धुमाळ यांनी ऑफ्रोह च्या शासन दरबारी न्यायीक मागणीवर भाष्य केले. Annual General Meeting of Afroh’ concluded
नुकत्याच झालेल्या नागपूर आदिवेशनामध्ये अनुसुचित जमातीमधील 33 अन्यायग्रस्त जमातींच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत अतिशय आक्रमक बाजू मांडली त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रमेशदादा पाटील, आमदार विकासभाऊ कुंभारे , अलिबागचे आमदार जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे यांचे अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते यांच्या हस्ते सांगली जिल्हातील ऑफ्रोहचे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सेवा निवृत्त मुख्याद्यापक आप्पासो बाळू कोळी यांनी रु.25,000/-, आंनदराव साळुंखे यांनी रु.10,000/-हैबतराव कोळी यांनी रु.5,000/-, संभाजी कोळी यांनी रु.5,000/-,अंकुश सोनकुसळे यांनी रु.5,000/- यांनी ऑफ्रोह ला लढा निधी म्हणून देणगी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता व्ही.डी.कोळी यांनी केले. Annual General Meeting of Afroh’ concluded
