• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चलत चित्र रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा

by Manoj Bavdhankar
January 24, 2023
in Guhagar
107 1
0
Rangoli Exhibition at Guhagar
210
SHARES
599
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर उफराटा गणपती ; तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे हस्ते 

गुहागर, ता. 24 : श्री देव गणपती ( उफराटा) फंड, देवपाट-माघी गणेशोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चलचित्र रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे हस्ते करण्यात आले. श्री. संतोष केतकर, (चिपळूण)”इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गौरविलेले” यांचे हे प्रदर्शन दि. 24 ते 27 जानेवारी पर्यंत देवपाट येथील देवस्थळी यांचे घरी आहे. Rangoli Exhibition at Guhagar

Rangoli Exhibition at Guhagar

या  प्रदर्शनात  श्री गणपती, श्री देव गणपती (उफराटा), विक्रम गोखले, पं. राम मराठे, विद्याधर गोखले, पं.वसंतराव देशपांडे, बालगंधर्व अशा निरनिराळ्या रांगोळी प्रदर्शनात काढण्यात आलेल्या आहेत. या उद्घाटनासाठी आय डी बी आय बँक मॅनेजर सौ. दीप्ती मुंजे, देवस्थान अध्यक्ष मंदार आठवले, केदार परसुरे, सौ ज्योती परचुरे, सौ प्राची देवस्थळी,  प्रकाश देवस्थळी, सतीश देवस्थळी, चिन्मय सावरकर, उदय आठवले आदी आधी मान्यवर उपस्थित होते. Rangoli Exhibition at Guhagar

या माघी गणेश उत्सवातनिमित्त मंगळावर दि. 24 रोजी सकाळी 7 वा. श्रीं षोडोपचार पुजा, 8 वा. सहस्त्रावर्तन व आरती. सायंकाळी 5 ते 7  महिलांसाठी हळदी-कुंकू, रात्री १० वा.ह.भ.प चिंतामणी निमकर (पुणे) यांचे कीर्तन. बुधवार, दि. २५ सकाळी रोजी ७ वा. श्रीं षोडोपचार पुजा, सकाळी ८ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ५ ते ७  महिलांचे अथर्वशीर्ष पठण, रात्री ९ वा महाआरती, रात्री १० वा.ह.भ.प. चिंतामणी निमकर, यांचे किर्तन.  गुरुवार, दि. 26 रोजी रात्री ९.३० वा.श्री गजानन नाट्य समाज स्मरणिका प्रकाशन. हे प्रकाशन श्री. श्रीराम खरे, उद्योजक व गणेशभक्त, श्री. अमर पेठे, उद्योजक, पेठे ब्रेक मोटर्स, मोडकागर, श्री. समीर काळे, मॅगो व्हिलेज, गुहागर, श्री.किरण खरे, अध्यक्ष, श्री.दुर्गादेवी देवस्थान, गुहागर, श्री.शार्दुल भावे, अध्यक्ष, श्री. व्याडेश्वर देवस्शान, गुहागर यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी श्री गजानन नाट्य समाज, गुहागर या संस्थेत योगदान दिल्याबद्दल सत्कार डॉ. वसंत ओक, श्री. अशोक आठवले, श्री. अरूण परचुरे, श्री.उदय सावरकर, श्री.अविनाश आगाशे यांचा सत्कार होणार आहे. तर रात्री १० वा.अविनाश आगाशे (मुंबई) यांचे संगीत सेवा कार्यक्रम आहे. Rangoli Exhibition at Guhagar

शुक्रवार, दि. 27 रोजी रात्री 10 वा. रंग मंदिर गुहागर येथे संगीत संत कान्होपात्रा, लेखक ना. वी.कुलकर्णी, दिग्दर्शक विवेक जोशी, संगीत मार्गदर्शन राजाभाऊ शेंबेकर करणार आहेत. रविवार, दि. २९ रोजी 9.30 वा. श्री गजानन नाट्य समाज देवपाट शतकपूर्ती सोहळा. यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन सौ.प्रतिभा वराळे, मा.तहसिलदार, गुहागर, श्री. राजेश बेंडल, नगराध्यक्ष, गुहागर नगरपंचायत‍. येणार आहेत. रात्री १० वा. रंगमंदीर गुहागर येथे सामाजिक नाटक ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ दिग्दर्शक, श्री. उदय सावरकर, व लेखक, वसंत सबनीस. Rangoli Exhibition at Guhagar

Rangoli Exhibition at Guhagar

तरी या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव गणपती ( उफराटा) फंड, देवपाट यांनी केले आहे. Rangoli Exhibition at Guhagar

Rangoli Exhibition at Guhagar


Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRangoli Exhibition at GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet53
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.