श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान तर्फे
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील श्री देव व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थान वेळणेश्वर तर्फे श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवार दि. २५ ते गुरुवार दि. २६ जानेवारी हे दोन दिवस साजरा होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Maghi Ganeshotsav at Valaneshwar

श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळानिमित्त बुधवार दिनांक २५ रोजी सकाळी ५.३० वा. मानकरी पुजारी गुरव यांची पुजा, सकाळी ७ वा. श्रींची षोडशोपचारे पुजा व अभिषेक एकादशनी आवर्तने, सकाळी १०.३० वा. ह.भ.प. सौ. श्रृती मायदेव यांचे जन्मकाळाचे किर्तन व आरती, दुपारी १२.३० वा. श्रींची रथाधिष्ठीत मुर्तीची मंदिर आवारात मिरवणूक, रात्रौ १०.०० वा. स्थानिक मंडळींची भजने. गुरुवार दिनांक २६ रोजी सकाळी ५.३० वा. मानकरी पुजारी गुरव यांची पुजा, सकाळी ७ वा. श्रींची षोडशोपचारे पुजा, सकाळी ९.०० वा. गणेशयाग प्रमुख संकल्प, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, आचार्यवरण, मुख्यदेवता स्थापन, जप, ग्रह देवता हवन पुर्णाहुती, अभिषेक, आरती, महाप्रसाद, रात्रौ १०.०० वा. स्थानिक मंडळींची भजने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Maghi Ganeshotsav at Valaneshwar
तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त कमिटी वेळणेश्वर यांचेकडून केले आहे. Maghi Ganeshotsav at Valaneshwar
