गुहागर, वरचापाट मंदिरात दि. २६ रोजी स्त्री पात्रांनी नटलेले बहुरंगी नमन
गुहागर, ता. 24 : वरचापाट दुर्गादेवीवाडी येथील स्वयंभू श्री महागणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने श्री दुर्गादेवी सहयोग मंडळाच्यावतीने २४ ते २६ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple

स्वयंभू श्री महागणपती हे जागृत देवस्थान असून भाविकांच्या इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून ओळखले जाते. माघी गणेशोत्सवानिमित्त आज दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता विधिवत पूजा, ११ वा. महाआरती, व सायं. ७ वा. हरिपाठ, दि. २५ रोजी पहाटे ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८ वा. श्रीचे दर्शन, १०.३० ते दुपारी २.३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ वा. महिलांचे हळदीकुंकू, सायं. ७ वा. महाआरती व रात्री ८.३० वाजता सुस्वर भजने, दि. २६ रोजी रात्री श्री दुर्गादेवी सहयोग मंडळ तर्फे मैत्रीबंध ग्रुप दुर्गादेवीवाडी आयोजित माऊली कलामंच मुंबई निर्मित स्त्री पात्रांनी नटलेले लोकप्रिय बहुरंगी नमन आणि अन्यायाला वाचा फोडणारे काल्पनिक वगनाट्य झुंज हा प्रयोग सादर होणार आहे. Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple

तरी समस्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दुर्गादेवी सहयोग मंडळ व महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. Festival at Swayambhu Shri Mahaganpati Temple
