कुणबी समाजाच्या वतीने गुहागर तहसिलदार व पोलिसांना निवेदन
गुहागर, ता. 24 : गुंड गणेश कदम आणि साथीदारांचा बंदोबस्त करा, जीवघेणा हल्ल्याचे गुन्हे दाखल करा. सर्व आरोपींना शोधून अटक करा, गणेश कदम याला कोकणातील हद्दीतून कायमचा तडीपार करा, अशा विविध मागण्याचे निवेदन आज गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना देण्यात आले. यावेळी गुहागर तालुका कुणबी समाजाच्यावतीने रामचंद्र हुमणे, कृष्णा वणे, राजेश बेंडल आणि प्रमुख नेते यांच्या उपस्थित होते. Statement on behalf of Kunbi community

दि. १८ जानेवारी २०२३ रोजी बेकायदेशीर संघात घुसून आपल्या साथीदारासह कुणबी समाजाची अस्मिता, मातृसंस्थान परेल येथील कार्यालयात हल्ला करण्यात आला होता. आक्षेर्पाह पोस्टची खातरजमा न करता मनसेच्या काही माथेफिरुंकडून कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ह्या मातृसंस्थेत घूसून युवा पदाधिकार्यांवर भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. अशा या विकृत माथेफिरुंचा बंदोबस्त करण्यासाठी गुहागर तहसिलदार व गुहागर पोलिस ठाणे यांना निवेदन देण्यात आले आहे. Statement on behalf of Kunbi community

यावेळी तालुका ग्रामिण शाखा, गुहागर-पालशेत-हेदवी-तवसाळ गट, युवक मंडळ आणि महिला मंडळ यांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भ्याड हल्ल्याचा समस्त ओबीसी व कुणबी समाज जाहीर निषेध करत आहे. Statement on behalf of Kunbi community

