• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्मशानभूमीतील कमी लाकडेमुळे नागरिक संतप्त

by Manoj Bavdhankar
January 24, 2023
in Guhagar
176 1
0
Angry citizens visited the Nagar Panchayat
345
SHARES
986
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : देवपाठ स्मशानभूमीत लाकडे खूप जाडी असून कमीही आहेत. तसेच तेथील लाकडं ठेवण्यात येणाऱ्या इमारतीची शटरही गंजली असल्यामुळे कायम उघडी असतात. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत मध्ये जाऊन भेट दिली. Angry citizens visited the Nagar Panchayat

देवपाठ स्मशानभूमीत गेले काही महिने जाडी लाकडं आहेत. अनेक  वेळा नागरिकांनी नगर पंचायत मध्ये तक्रार करून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याने  नागरिक संतप्त झाले होते. त्यावेळी नागरिकांनी तिथूनच दूरध्वनी करुन असलेली वस्तुस्थिती पाहण्यासाठी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याला पाठवण्याची साहेबांजवळ मागणी केली. त्याप्रमाणे नगरपंचायतचे कर्मचारी येऊन तेथिल वस्तुस्थितीची पाहणी केली. तिथे लाकडं फार कमी असून अत्यंत जाडी आहेत. ती लाकडं एका माणसाला उचलताही येत नाहीत. तसेच या इमारतीला दोन्ही साईडला शटर आहेत. परंतु ती शटर पूर्णपणे सडली असल्यामुळे उघडीच असतात. अशा परिस्थितीत आत कोणी वन्य जनावर जावून राहू शकतील. याचीही भीती नागरिकांमध्ये आहे. Angry citizens visited the Nagar Panchayat

नागरिकांनी ही वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांना दाखवल्यानंतर तसेच स्मशानभूमीतून थेट नगरपंचायत मध्ये जाऊन या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार बदलावा व इमारतीला शटर लावावी अशी मागणी केली . तसेच नगरपंचायत टेंडर मध्ये विहित नमुन्याप्रमाणे असलेली लाकडे लवकरात लवकर स्मशानभूमीत टाकावी, अशी मागणी केली. वरचापाट बाग येथीलही स्मशानभूमीत गेले दोन महिने लाकडे नसुन सतत मागणी करत असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. Angry citizens visited the Nagar Panchayat

Tags: Angry citizens visited the Nagar PanchayatGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share138SendTweet86
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.