• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्टॉलसाठी बचतगट आणि उद्योजकांना आवाहन

by Ganesh Dhanawade
January 23, 2023
in Ratnagiri
99 1
0
Food Festival by Aparant Research Centre
195
SHARES
556
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण येथे दि. ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ महोत्सव; २५ जानेवारी पर्यंत नावनोंदणी

गुहागर, ता. 23 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दि. ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपन्न होणार आहे. तरी पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवातील स्टॉलसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Food Festival by Aparant Research Centre

लोककलांबद्दल सर्वांना जिव्हाळा आणि आदर आहे. लोककला जीवंत ठेवण्याचे महत्वाचे काम लोककलावंतानी केलेलं आहे. कोकणातल्या लोककला, पर्यटन, कोकणी खाद्यसंस्कृती यांची ओळख सर्वदूर व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणी खाद्य संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी महोत्सवात खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील शाकाहारी, मांसाहारी आणि मस्त्याहारी खाद्यपदार्थाची मेजवानी उपलब्ध असणार आहे. Food Festival by Aparant Research Centre

पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवांतर्गत १० × १० फूट आकारचे २२ स्टॉल सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी २५ जानेवारी पर्यंत नावनोंदणी करणाऱ्या इच्छूकांना हे स्टॉल उपलब्ध होणार आहेत. २९ जानेवारी रोजी सोडत पद्धतीने स्टॉलचे वाटप केले जाणार आहे. इच्छूकांनी अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख प्रकाश घायाळकर मो. ९७६५८६८७२२ आणि सुनील खेडेकर मो. ९४२०१५६७९७ येथे संपर्क साधावा. Food Festival by Aparant Research Centre

Tags: Food Festival by Aparant Research CentreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.