महाविकास आघाडीचा पराभव
गुहागर, ता. 23 : तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनलचे १२ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले. ही निवडणूक आमदार जाधव यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले. Purchase Sales Team Election
या निवडणूकीत अनेक वर्षे गुहागर वि. का. सहकारी सोसायटी, खरेदी विक्री संघ, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पद भूषवणारे, राष्ट्रवादीचे गुहागर तालुकाध्यक्ष, पद्माकर आरेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच गुहागरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय जयदेव मोरे यांचा पराभव झाला. Purchase Sales Team Election
संचालक पदाच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पँनलचे रविंद्र अवेरे, सुरेश चौगुले, लक्ष्मण शिगवण, गणेश तांबे, नारायण गुरव व महाविकास आघाडीचे पंकज बिर्जे, पांडुरंग कापले या सर्वांना १० मते मिळाली. विजयी 7 उमेदवारांमधून 6 संचालक निवडायचे होते. त्यामुळे विजयी 7 उमेदवारांच्या चिठ्ठ्यांमधून 1 चिठ्ठी उचलून तो उमेदवार बाद करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी घेतला. त्यामध्ये सहकार पॅनलचे नारायण गुरव यांना बाद करण्यात आले. Purchase Sales Team Election

खरेदी विक्री संघाच्या १५ संचालक पदासाठी निवडणूक होती. त्यापैकी छाननीमध्ये भटके विमुक्त प्रवर्गात सहकार पँनलचा एक अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन बाईत बिनविरोध निवडून आले होते. मात्र विकास सहकारी संस्था मतदार संघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सहकारी पॅनलचे सहकारी संस्था मतदार संघातून श्रीकांत महाजन १२ मते, डॉ. अनिल जोशी, शाम गडदे, सिराज घारे यांना ११ मते पडून विजयी झाले. रविंद्र अवेरे, सुरेश चौगुले, लक्ष्मण शिगवण, गणेश तांबे यांनी १० मते घेऊन तर महाविकास आघाडीचे पंकज बिर्जे, पांडुरंग कापले यांना १० मते मिळवून विजय मिळाला. Purchase Sales Team Election
महिला मतदार संघातून सहकार पॅनलच्या अश्विनी आनंद जोशी, रश्मी रघुनाथ घाणेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया सुधाकर साळवी, सुवर्णा दिनानाथ भोसले यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून सहकार पॅनलचे तवसाळ पडवे सोसायटी चेअरमन सुभाष कोळवणकर यांनी गुहागरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय जयदेव मोरे यांचा पराभव केला. मागासवर्गीय मतदार संघात सहकार पॅनलचे पंचायत समिती माजी सभापती सुरेश सावंत यांनी अनंत पवार यांचा धुव्वा उडवला. Purchase Sales Team Election
या निवडणूकीतील विशेष बाब म्हणजे अनेक वर्षे गुहागर सोसायटी, खरेदी विक्री संघ, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पद भूषवणारे राष्ट्रवादीचे गुहागर तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आमदार भास्कर जाधव यांनी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. मतदारांची संख्या कमी असल्याने आमदार जाधव यांच्या प्रभावामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असे वातावरण होते. मात्र महाविकास आघाडीचे केवळ 3 उमेदवार निवडून आले. त्यामुळे एकप्रकारे हा आमदार जाधव यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. Purchase Sales Team Election
सहकार पॅनलच्या विजयासाठी माजी आमदार डॉ विनय नातू आणि जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. अनिल जोशी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष डॉ आनंद जोशी, भाजपा उत्तर रत्नागिरी ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजपा जिल्हा चिटणीस मंगेश जोशी, इक्बाल घारे,विजय मसुरकर, पांडुरंग नाचरे, संदिप साळवी आदींसह सर्वपक्षीय सहकार प्रेमींनी मेहनत घेतली. Purchase Sales Team Election