• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बुरोंडी बंदरात जेटी नसल्याने मच्छिमारांची गैरसोय

by Mayuresh Patnakar
January 23, 2023
in Ratnagiri
94 1
0
Disadvantage of fishermen in Burondi port
184
SHARES
527
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 :  देशाच्या स्वातंत्र्याचा एकीकडे अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी दुसरीकडे मात्र अजूनही देशातील खेडेगावांचा विकास हा झालेलाच नाही. अशाचप्रकारे बुरोंडी बंदरात जेटी बांधण्यात आली नसल्या कारणाने मासेमारांचे जेटीविना हालच हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र शासन नुसतेच जाहीरातबाजी करून विकासाचे आभास दाखवते आहे हे यावरून स्पष्ट झालेले आहे. Disadvantage of fishermen in Burondi port

दापोली तालूक्यातील बुरोंडी बंदरात मासेमार व्यवसायिकांकडून केंद्र शासनाकडे सातत्याने बुरोंडी बंदरात जेटी उभारण्याची गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ करण्यात येत असलेली  मागणी केंद्र शासनाला अजूनही पुर्ण करता आलेली नाही. त्यामुळे समुद्रातून पागून आणलेली मासळी किनाऱ्यावर आणताना मच्छिमांराची चांगलीच दमछाक होत आहे. शिवाय मासेमारी करण्यासाठी किनाऱ्यावरील बोटी समुद्रात नेताना मासेमारांना खुपच कष्ट उपसावे लागत आहेत. Disadvantage of fishermen in Burondi port

दापोली तालूक्यातील बुरोंडी बंदर हे एक ऐतिहासिक बंदर तर आहेच. शिवाय या बंदराची ओळख प्रामुख्याने ताज्या आणि स्वस्त मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मासळी खरेदीसाठी दापोली शहर आणि तालूक्यातील अन्य भागातून हॉटेल व्यवसायिकांसह खवय्यांची गर्दी येथे असते. बुरोंडी हे मासेमारीचे बंदर असतानाही इतके वर्ष झाले तरी येथे मासळी मार्केट नाही. त्यामुळे मासळी खरेदीसाठी येणाऱ्यांना बुरोंडी येथील बंदरावरच जावून मासळी खरेदी करावी लागते. मासेमार हे समुद्रातून पागुन आणत असलेली मासळी होडयांमधून समुद्र किनाऱ्यावर कसरत करत आणावी लागते. तरीही याकडे एक गंभीर समस्या म्हणून ना प्रशासनातील अधिकारी बघत ना केंद्र शासनाकडून पाहीले जात. त्यामुळे येथील मासेमारांची जेटीची समस्या ही अजूनही कागदावरच आहे. Disadvantage of fishermen in Burondi port

बुरोंडी बंदर किनारी भाग हा बहुतांशी मच्छिमारी बांधवांच्या वस्तीचा आहे. येथील रहीवाशांचे उपजीविकेचे प्रमुख साधन  मासेमारी आहे. बुरोंडी गावातील रहीवाशांच्या शासनाच्या फिशरीज परवाना अधिकारी दाभोळ येथील कार्यालयात 256 बोटी नोंदणीकृत परवानाधारक आहेत. तर छोटया लहान होडयांची डिंग्यांची परवानगी नसते अशा अनेक होडया आहेत या बोटी तसेच होडया लावण्यासाठी बंदरावर जेटीची सोय नसल्याने साधारणपणे समुद्रात तीनशे मिटर अंतरावर पाण्यात बोटी उभ्या करून लहान (होडया) डिंग्याच्या सहाय्याने पागलेली मासळी किना-यापर्यंत आणावी लागते.कधी कंबरेभर पाण्यातून तर कधी खांदयाचा वापर करत कधी होडींच्या उलडीला खांदा देत किना-यावर यावे लागते. ही सारी मासेमारांची मरण यातना कधी संपुष्टात येणार याच्याच प्रतिक्षेत बुरोंडीतील मच्छिमार बांधव आहेत. Disadvantage of fishermen in Burondi port

समुद्रात दुरवर नांगरून ठेवलेल्या बोटी फिशींगला समुद्रात लोटण्यापूर्वी मासेमारीस जाणाऱ्या बोटींमध्ये चार दिवसाची लागणारी सामुग्री जसे पाणी, डिझेलसाठा, जाळी, खाण्याच्या वस्तू आदी समुद्रात बोटींपर्यत न्याव्या लागतात. या सर्व डिंग्या अथवा लहान होडयांमधून त्या बोटीपर्यंत न्याव्या लागतात. यात मासेमारांच्या वेळेसह आर्थिक नुकसानही होते. त्यात बोटींच्या दुरूस्तीची डागडूजी करावयाची असेल तर आणखीनच त्रासाचे होते. मच्छिमार दर्यावर्दी लोकांच्या जेटीसारख्या महत्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनासह केंद्र शासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे अजून कितीकाळ वाट पाहील्यानंतर बुरोंडी जेटीचा प्रश्न निकाली निघणार असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. Disadvantage of fishermen in Burondi port

Tags: Disadvantage of fishermen in Burondi portGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.