अभियांत्रिकी महाविद्यालय मधील इंस्टूमेटेंशन अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका
गुहागर, ता. 22 : वेळणेश्वर येथील विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय मधील इंस्टूमेटेंशन अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. मीना कश्यप यांनी पेटंट मिळविण्यात यश मिळविले आहे. त्यांना ‘लहान आणि मोठ्या उद्योगांसाठी जोखीम कमी करणारे उपकरण’ या विषयावर पेटंट मिळाले आहे. Patent obtained by Meena Kashyap

लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. गेल्या काही दशकांमध्ये लोकांना कामावर आणि घरी आराम करण्यास मदत करण्यासाठी खूप अशा मशिन्स बनवल्या आणि डिझाईन केल्या गेल्या. मशीनमुळे लोकांचे गंभीर शारीरिक नुकसान झाले. प्रसंगी त्यांचे प्राणही गेले आहेत. अशा परिस्थितीत लोकांचे जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी या शोधाचा वापर मशिन्सच्या सहाय्याने केला जाणार आहे. सदर पेटंट दिनांक १३ जानेवारी २०२३ च्या ‘इंडियन पेटंट ऑफिस’ या नियतकालिकेमध्ये प्रकाशित झाला. Patent obtained by Meena Kashyap

प्रा. मीना कश्यप त्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, विभागप्रमुख केतन कुंडीया व इतर शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. Patent obtained by Meena Kashyap
