• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गावकऱ्यांसाठी धावणारा निलेश मृत्युमुखी

by Ganesh Dhanawade
January 22, 2023
in Guhagar
307 4
0
Driver Nilesh Jadhav is No More
604
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 :  मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये दहा लोकांनी आपला जीव गमावला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास माणगावच्या रेपोली गावानजीक ही दुर्घटना घडली. याठिकाणी एका ट्रकने समोरून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली. समोरासमोर टक्कर झाल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. या अपघातामध्ये गुहागर तालुक्यातील हेदवी गावचा रहिवाशी, गावकऱ्यांसाठी नेहमीच धावपळ करणारा आणि उत्तम चालक असलेला निलेश शशिकांत जाधव आपल्या गावी जातानाच मृत्युमखी पडला आहे. Driver Nilesh Jadhav is No More

मुंबई गोवा महामार्गावरती गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी काहीजण गुहागरच्या हेदवी गावातील होते. त्यामुळे अपघाताची बातमी येताच हेदवी गावावर शोककळा पसरली. गुरुवारी रात्री १० वाजता सहा जणांवर हेदवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील एका वाहन चालकाचा बळी गेला आहे. Driver Nilesh Jadhav is No More

निलेश पुन्हा गावी परतलाच नाही…

निलेश शशिकांत जाधव मुंबईमध्ये वाहन चालकाची नोकरी करायचा. गेल्या अनेक वर्षांपासून निलेश मुंबईत काम करत होता. निलेश गाडीचे भाडे घेऊन मुंबईला गेला होता. तिथून परत येत असताना हेदवी गावातील जाधव, डावखोतमधील पंडित कुटुंबीयांसह आणखी काही लोक त्याच्या गाडीत होते. परंतु, गावी परतत असताना या सगळ्यांना वाटेतच मृत्यूने गाठले. निलेश जाधव हेदवी गावातील जुळेवाडी येथे राहत होता. या अपघातामुळे जाधव कुटुंबातील एकुलता एक मुलगा हिरावला गेला आहे. निलेशचे वडील शशिकांत जाधव गवंडी काम करतात. निलेशच्या पश्चात आई-वडील व छोटी बहीण असा परिवार आहे. चालक म्हणून गावातल्या अनेकांना उपयोगी पडत होता. हेदवी येथील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते. Driver Nilesh Jadhav is No More

गेल्यावर्षी गणपतीच्यावेळी निलेश मुंबईहून गावी परतला होता. पुढील काही महिने तो गावातच राहिला. दोन वर्षांपूर्वी त्याने गावात टेम्पोचा व्यवसाय सुरु केला होता. परंतु, हा व्यवसाय फारसा न चालल्यामुळे काही दिवसांपूर्वीच निलेश मुंबईला परतला होता. निलेश उत्तम चालक व गावातील अनेकांना उपयोगी पडणारा तरुण होता. त्याच्या जाण्याने हेदवीतील मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. Driver Nilesh Jadhav is No More

कारने येण्याऐवजी ट्रॅव्हल्सने गेला अन् जीव वाचला….


कोकणात मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव येथे झालेल्या अपघातात गुहागर तालुक्यातील हेदवी येथील जाधव कुटुंबावर निष्ठूर नियतीने घाव घातला आहे. मुलगी, जावई, नातवंड अशी एकूण जवळची दहा माणसं गमावली आहेत. सुदैवाने याच कुटुंबातील निलेश मनोहर जाधव हा ट्रॅव्हल्सने गुरुवारी सकाळीच गावात पोहोचला होता. तोही याच इको कारमधून येणार होता, पण तो ऐनवेळी ट्रॅव्हल्सने हेदवीला आला आणि त्याचा जीव वाचला. हे कुटुंब आजी शेवंती सखाराम जाधव यांच्या वर्षश्राद्धसाठी हेदवी येथे येत होते. Driver Nilesh Jadhav is No More

अपघातात जखमी झालेल्या मुलानेही तोडला दम

या अपघातात आई, वडील बहीण संपूर्ण कुटुंब संपलं. मूळचे डावखोतमधील असणारे आणि मुंबईत मेडिकलमध्ये काम करणारे निलेश पंडित (४५), त्यांची पत्नी नंदिनी पंडित (३५) , त्यांची कन्या मुद्रा पंडित (१२) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, अपघातात जखमी झालेल्या भव्य पंडित या ४ वर्षांच्या मुलाचाही नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. Driver Nilesh Jadhav is No More

Tags: Driver Nilesh Jadhav is No MoreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share242SendTweet151
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.