• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत सायकल फेरी

by Ganesh Dhanawade
January 21, 2023
in Health
64 1
0
Cycle round in honor of senior citizens
126
SHARES
359
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्ट तर्फे २२ जानेवारीला

गुहागर, ता 21 : वाढीच्या व विकासाच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याचे चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व (प्रौढ वय) व वृद्धावस्था (म्हातारपण). घरातील वृद्ध व्यक्तींचा अनुभव नेहमी आपल्या कामी येतो, यामुळे वृद्धांचा सन्मान आदर झालाच पाहिजे. या जेष्ठ नागरिकांना मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्ट तर्फे रविवार २२ जानेवारी २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. Cycle round in honor of senior citizens

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती केळसकर नाका- बुरोंडी नाका- फॅमिली माळ- पंचायत समिती- गणेश दत्तात्रय दातार वृध्दाश्रम- नटराज नाका- पोस्ट ऑफिस- आझाद मैदान अशी ५ किमीची असेल. या सायकल फेरी दरम्यान दापोलीतील गणेश दत्तात्रय दातार वृध्दाश्रमामध्ये जाऊन तेथील कार्याबद्दल जाणून घेण्यात येईल. Cycle round in honor of senior citizens

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ९६७३७५०५५८, ९०२२८७४८८१ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cycle round in honor of senior citizens

Tags: Cycle round in honor of senior citizensGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet32
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.