• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उदय सामंत प्रवासात असताना बोटीचे इंजिन भर समुद्रात बंद

by Ganesh Dhanawade
January 21, 2023
in Bharat
102 1
0
The boat's engine shut down in the sea

उदय-सामंत

201
SHARES
573
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दुसरी स्पीड बोट आल्याने संकट टळले

मुंबई, ता. 21 :  राज्यात नेत्यांच्या अपघातांच्या घटना सुरू असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा मोठ्या अपघातातून बचावले आहेत. मांडवाहून मुंबईत येताना ते प्रवास करत असलेली स्पीड बोट अचानक बंद पडली. बोटीमधील सर्व यंत्रणा अचानक बंद पडल्याने कॅप्टनला रेस्क्यूसाठी आपत्कालीन संदेशुद्धा पाठवता येत नव्हता. मात्र, लागलीच दुसरी स्पीड बोट आल्याने मोठे संकट टळले आहे. The boat’s engine shut down in the sea

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. मात्र, अचानक स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले. यामुळे बोटीतल्या सर्व यंत्रणा बंद पडल्या. यंत्रणा बंद पडल्याने कॅप्टनला तत्काळ SOS हा आपत्कालीन संदेशही सुरक्षा यंत्रणांना पाठवता येत नव्हता. दरम्यान, भर समुद्रातच हा प्रकार घडल्याने कोणाच्या मोबाईललाही रेंज नव्हती. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्याकांनी त्यांच्या मोबाईलला कमी रेंज असतानाही रेस्क्यूसाठी संपर्क साधला. त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना रेस्क्यू करण्याकरता तत्काळ दुसरी स्पीड बोट मागवण्यात आली. काही वेळातच ही दुसरी स्पीड बोट घटनास्थळी दाखल होत उदय सामंत यांना सुखरूप गेट वे ऑफ इंडियाला आणण्यात आले. The boat’s engine shut down in the sea

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe boat's engine shut down in the seaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.