• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेच्या उमरोली शाखेचे स्थलांतर

by Ganesh Dhanawade
January 20, 2023
in Maharashtra
131 1
0
Migration of Shri Samarth Bhandari Umroli Branch
258
SHARES
736
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सोहळा दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता

गुहागर, ता. 20 :  ग्राहकांच्या विश्वासाला पात्र असलेल्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण या संस्थेच्या उमरोली शाखेचे स्थलांतर करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते होणार आहे. Migration of Shri Samarth Bhandari Umroli Branch

मनीषा कॉम्प्लेक्स, तळमजला साई मंदिर समोर, उमरोली फाटा, ता. चिपळूण येथे श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थलांतरित शाखेचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी समस्त ग्राहक, हितचिंतक यांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Migration of Shri Samarth Bhandari Umroli Branch

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., चिपळूण या पतसंस्था रत्नागिरी जिल्हयातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकीक प्राप्त केला आहे. या संस्थेची स्थापना १३ जून २००२ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर वि. आरेकर यांनी केली. संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेने विश्वासार्ह पतसंस्था म्हणून संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक कमावला आहे. संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर वि. आरेकर यांनी आपले सहकारी संचालक यांचे सहकार्याने केले आहे. सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता व व्यावसायिकता या प्रमुख तत्वांवर संस्थेचे कामकाज सुरू असून त्यामुळे सभासद व ठेवीदार यांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. Migration of Shri Samarth Bhandari Umroli Branch

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMigration of Shri Samarth Bhandari Umroli BranchNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet65
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.