• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्युत खांब न बदलल्यामुळे प्रजासत्ताकदिनी उपोषण

by Ganesh Dhanawade
January 20, 2023
in Guhagar
95 1
0
More's statement to Maha distribution

गुहागर महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना

187
SHARES
534
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळंब उपसरपंच श्रीकांत मोरे यांचे महावितरणला निवेदन

गुहागर, ता. 20 :  तालुक्यातील वेळंब येथील उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी प्रजासत्ताकदिनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत निवेदन गुहागर महावितरण कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. More’s statement to Maha distribution

गुहागर तालुक्यातील वेळंब येथील धोकादायक विद्युत खांब गेली अनेक वर्षे महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही बदलण्यात आलेले नाहीत. महावितरणकडून होत असलेल्या या दुर्लक्षामुळे धोकादायक विद्युत खांब असलेल्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणच्या या डोळेझाकपणावर आवाज उठवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी गुहागर महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा वेळंब उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी दिला आहे.  याबाबत निवेदन गुहागर महावितरण कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. More’s statement to Maha distribution

या निवेदनात वेळंब गावातील धोकादायक असलेले विद्युत खांब बदलण्यासाठी दिनांक 2 एप्रिल 2015 व दिनांक 9 ऑगस्ट 2021 असा दोन वेळा लेखी पत्रव्यवहार केला होता. तर काही वेळा प्रत्यक्ष भेटूनही याबाबत विनंती केली होती. यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हे धोकादायक विद्युत खांब आहेत त्याबाबतही माहिती दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजाने 26 जानेवारी रोजी गुहागर महावितरण कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. More’s statement to Maha distribution

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMore's statement to MahavitraanNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.