• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे हायस्कूलचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश

by Ganesh Dhanawade
January 20, 2023
in Guhagar
89 1
0
Patpanhale High School successful

पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करताना प्रा. मनाली बावधनकर

175
SHARES
499
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गीत गायन स्पर्धेत प्रथम तर समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक

गुहागर, ता. 20 : तालुका मुख्याध्यापक संघातर्फे समूह गीत गायन स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा तसेच समाजप्रबोधनात्मक किंवा विनोदी नाटिका हे तालुकास्तरीय कार्यक्रम पालशेत हायस्कूल येथे संपन्न झाले. यातील समूह गीत गायन स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक व समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादन केला. Patpanhale High School successful

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे श्रीमती रखुमाबाई पालशेतकर विद्यालय पालशेत या विद्यालयात तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाने “भारता जय भारता ” हे समूहगीत सादर करून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. मानसी संदीप पालकर, मृण्मयी दत्ताराम जाधव, शमिका सुमंत भिडे, राधा प्रसाद भिडे, आर्या अनंत जानवळकर, कस्तुरी समीर वझे, ओजस्वी सुधीर वासनिक या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. इयत्ता नववीमधील विद्यार्थी कु. वेदांत महेंद्र गुरव याने सदर समूह गीतासाठी पेटीवादन तर मकरंद गाडगीळ यांनी तबलावादनाची साथ दिली. शिक्षक श्री.एस.वाय. भिडे यांचे मार्गदर्शन लाभले. Patpanhale High School successful

समूह नृत्य स्पर्धेमध्ये पाटपन्हाळे हायस्कूलने ” शिव मार्तंड मल्हारी ” हे समूह नृत्य सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला. सदर समूहनृत्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षिका सौ. एस.एस. चव्हाण, सौ. एस. एस. नांदलस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. कु.सियानी रमेश तांबे, तेजल चंद्रकांत मोहिते, अनुष्का विनायक साळवी, आर्या निलेश चाळके, कशिश संदीप चांदोरकर, जयश्री विलास वीर, स्नेहल प्रमोद वेद्रे, सेजल मनोहर साळवी व कृणाली रमेश साळवी या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. Patpanhale High School successful

पाटपन्हाळे विद्यालयाने यश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक एम.ए थरकार, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Patpanhale High School successful

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPatpanhale High School successfulUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.