गुहागर, ता. 18 : लवेल येथील घरडा फाऊंडेशन संचालित घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद) (National Assessment and Certification Council) यांचेतर्फे झालेल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत ‘अ’ श्रेणी देऊन गौरविण्यात आले आहे. नॅकच्या तज्ञ समितीच्या उपस्थितीत नुकतीच ही पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पार पडली. A’ rating to Gharda Institute of Technology
महाविद्यालयामधील पायाभूत सुविधा आणि संसाधने, अध्यापन आणि अध्ययनाची गुणवत्ता, अभ्यासक्रमांची निवड आणि अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचे निकाल, शैक्षणिक आणि सहशैक्षणिक विभागातील कामगिरी, संशोधन कार्य आणि त्याचे प्रकाशन, प्रशासन अश्या अनेक गोष्टींची तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करून हे मूल्यांकन केले जाते. २०१६ साली घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी हे अश्या प्रकारचे मूल्यांकन प्राप्त करणारे कोकणातील पहिलेच अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले होते. त्यावेळी महाविद्यालयास ‘ब+’ श्रेणी मिळाली होती. यावर्षी पाच वर्षाच्या विहित मुदतीनुसार महाविद्यालयाचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले, त्यामध्ये महाविद्यालयास थेट ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली असून, ही झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. A’ rating to Gharda Institute of Technology

कोकणातील विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने डॉ.के.एच. घरडा यांनी घरडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ची स्थापना केली होती. स्थापनेपासून अतिशय कमी कालावधीतच महाविद्यालयाने अनेक क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटविला आहे. नॅक मूल्यांकनादरम्यान घरडा महाविद्यालयातील मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे विविध उपक्रम, परीक्षा पद्धती, कौशल्य विकास योजना, सौर प्रकल्प आणि त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण, कॅम्पस प्लेसमेंट या सर्व गोष्टींची तज्ञ समितीने प्रशंसा केली. आजी व माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग या सर्वांच्या सहभागातून आणि परिश्रमातून महाविद्यालयाने हे स्पृहणीय यश संपादन केले असून नॅक मूल्यांकनामध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त करणारे हे कोकणातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. A’ rating to Gharda Institute of Technology
या उत्तुंग यशाबद्दल प्राचार्य डॉ.सचिन पाटील, आय.क्यू.ए.सी.प्रमुख डॉ.नितीन कोळेकर, सर्व विश्वस्त आणि विश्वस्त प्रतिनिधींकडून सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले. A’ rating to Gharda Institute of Technology
