शेट्ये नगर येथील आशियाना सहकारी गृह निर्माण संथा आणि परिसर; दोघेजण गंभीर जखमी
रत्नागिरी, ता. 18 : रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागातील शेट्ये नगर येथील आशियाना सहकारी गृह निर्माण संथा आणि परिसर आज बुधवारी पहाटे शक्तिशाली स्फ़ोट झाला. या परिसरात राहणाऱ्या अशफक काझी यांच्या घरात बुधवारी पहाटे हा स्फोट झाला आणि घराला आग लागली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, यात घराचा काही भाग कोसळला, स्लॅब कोसळला तर आगीने रौद्ररूपही धारण केले. Blast at Ratnagiri Shetye Nagar
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/01/add-3-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/01/add-3-1.jpg)
यात घरातील दोन महिलांसह चार जाणं अडकले. याची माहिती मिळताच शहर पोलिसांसह रत्नागिरी नगर परिषदेचे अग्निशमन यंत्रणा, एम आय डी सी येथील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ रेस्क्यू ऑपेरेशन ला सुरुवात केली. यातील अशफाक काझी आणि त्यांचा मुलगा अम्मार काझी याला बाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दोघंही गंभीर भाजले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरातील दोन्ही महिला ढीगाऱ्याखाली अडकल्या होत्या. त्यांच्या अंगावर स्लॅब कोसळला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघीना ढीगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दोघीनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दखल करण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. यात कनिज अशफाक काझी आणि त्यांची आई नुरून्नीसा हमीद अलजी अशी मृत महिलेची नावे आहेत. Blast at Ratnagiri Shetye Nagar
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हेही घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांसह फॉरेन्सिक टीम सुद्धा घटना स्थळी दाखल झाली होती. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनीही मोलाची मदत केली. हा स्फोट खूपच शक्तिशाली होता, यामुळे आजूबाजूच्या घरांचेही खूप नुकसान झाले. अनेकांनाच्या घराच्या काचा फुटल्या. याचा तपास शहर पोलिसांनी सुरु केला आहे. Blast at Ratnagiri Shetye Nagar