मराठी भाषा व वाड्मय मंडळातर्फे आयोजन
गुहागर, ता. 16 : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा शासन निर्देशित कार्यक्रम खरे ढेरे भोसले महाविद्यालयात ( Khare Dhere Bhosale College ) संपन्न झाला. मराठी भाषा व वाड्मय मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी हे कविसंमेल घेण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हाँल मध्ये काव्यास्वाद हा कविसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. Poets meeting in KDB college

या कार्यक्रमासाठी कवी श्री. चिन्मय ओक, कवी श्री. ईश्वर हलगरे, कवी श्री. मोहन पाटील या प्रमुख कवींनी काव्य सादरीकरण केले. यामध्ये विविध कविता सादर करण्यात आल्या. या कवी संमेलनाचा सर्व विद्यार्थ्यांसाठी भरघोष आस्वाद घेतला. Poets meeting in KDB college

कवी संमेलनात श्री. मोहन पाटील या कवींनी माझी मराठी, नाखवा, गुहागर गाव या सारख्या सुंदर कविता सादर केल्या. तर श्री चिन्मय ओक यांनी सखी, रामाच्या पादुका, कविता या सारख्या कविता, कवी ईश्वर हलगरे यांनी मायबाप, प्रेम, हे असंच असतं या कविता सादर केल्या. या कवितांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले. तर प्रभारी प्राचार्य प्रा विराज महाजन यांनी दीपप्रज्वलन केले. Poets meeting in KDB college

