गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पालपेणे, नरवण, कारूळ या तीन ठिकाणी सुरु असलेल्या गावठी दारु धंद्यावर शुक्रवारी गुहागर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Police raid on village liquor business

यामध्ये नामदेव महादेव पडवेकर (62, रा. पालपेणे कुंभारवाडी, गुहागर ), सुजाता सुधाकर शिरकर (50, रा. नरवण कुंभारवाडी, गुहागर ) आणि रवींद्र शिवराम हातीस्कर (63,रा.कारूळ गुहागर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. हे तिन्ही संशयित गैरकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी आपल्या जवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. Police raid on village liquor business
गुहागर पोलिसांनकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे गावठी दारु धंदा करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे. Police raid on village liquor business
