27 घरट्यातील 3 हजार 98 अंडी संरक्षित
गुहागर, ता. 15 : शहरातील समुद्रकिनाऱ्यावरुन ऑलिव्ह रिडले जातीच्या 35 पिल्लांना तिन दिवसांत समुद्रात सोडण्यात आले. गुहागर तालुक्यातील गुहागर व तवसाळ या दोन गावात वन विभागाने ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन करण्याचे ठरविले आहे. 27 घरट्यातील 3 हजार 98 अंडी संरक्षित केली आहेत. यावर्षी कासव महोत्सवाचे आयोजन करण्याचा विचार वन विभाग करत आहे. Olive Ridley Tortoise Conservation


गेल्या काही वर्षात कासव संवर्धन करणारे शहर अशी गुहागरची ओळख बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास (ता. मंडणगड) पाठोपाठ गुहागर शहरातील समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीची सर्वाधिक घरटी संरक्षित केली जातात. यावर्षी गुहागरमध्ये 23 नोव्हेंबरला पहिले घरटे मिळाले. आजपर्यंत गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर 25 घरट्यांमधुन 2 हजार 858 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. तवसाळ येथेही वन विभागातर्फे ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहिम राबवली जाते. तेथे 2 घरट्यातून 240 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. Olive Ridley Tortoise Conservation
23 नोव्हेंबरला मिळालेल्या घरट्यात 123 अंडी होती. या घरट्यातून गेले दोन दिवस कासवाची पिल्ले बाहेर पडत आहेत. गुरुवार (ता. 12), शुक्रवार (ता. 13) व शनिवार (ता. 14) या तीन दिवसात सकाळी आणि संध्याकाळी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. आजपर्यंत एकूण 35 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. Olive Ridley Tortoise Conservation
आजपर्यंत मिळालेल्या घरट्यांची संख्या आणि वेळ लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक पिल्ले समुद्रात झेपावण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरुन फेब्रुवारी महिन्यात वन विभागामार्फत गुहागरमध्ये कासव महोत्सव करण्याची तयारी सुरु आहे. Olive Ridley Tortoise Conservation