• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लष्कराच्या दक्षिण कमांडची राज्यांत वृक्षारोपण मोहीम

by Guhagar News
January 15, 2023
in Bharat
72 0
2
Tree plantation drive in states
141
SHARES
402
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव आणि लष्कर दिन 2023 चे औचित्य साधून

गुहागर, ता. 15 : स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव आणि लष्कर दिन 2023 चे औचित्य साधून भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने ११ राज्यांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविली. Tree plantation drive in states

बंगळुरू इथे पहिल्यांदाच होत असलेल्या सैन्य दिन संचलन २०२३ च्या निमित्ताने ही मोहीम राबवण्यात आली. लष्कराच्या छावणी क्षेत्रासोबतच, सामान्य नागरिकांशी संबंधीत इतर नागरी क्षेत्रातही ही मोहीम राबवली गेली. लष्कराच्या स्थानिक बटालियन आणि वन विभाग यांनी समन्वयपूर्वक ही मोहीम राबवली. या मोहीमेअंतर्गत फळझाडे, सावली देणारी झाडे, औषधी वनस्पती आणि इतर अनेक जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

दक्षिण कमांड मुख्यालयच्या अधिपत्याखाली असलेल्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा मुख्यालय उपक्षेत्राने पुण्यात दिघी टेकडी, खडकी आणि इतर अनेक नागरी तसेच शासकीय क्षेत्रात पुणे महानगरपालिका, वन विभाग आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम राबविली, याअंतर्गत ३,००० हून अधिक झाडे लावण्यात आली. Tree plantation drive in states

दक्षिण कमांडच्या जबाबदारीअंतर्गतच्या संपूर्ण क्षेत्रातातील शहरे, नगरे आणि गावांमध्ये हरित पट्टे निर्माण करण्यासोबतच, युवकांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्याचा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.  या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यात समाजातील सर्वच घटक आणि क्षेत्रांतील लोक सहभागी झाले होते. या सगळ्यांनी यो मोहीमेच्या माध्यमातून आपल्या उज्वल भवितव्यासाठी योगदान दिले. Tree plantation drive in states

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTree plantation drive in statesUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.