• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कायमस्वरुपी वायरमन द्या

by Mayuresh Patnakar
January 14, 2023
in Guhagar
132 1
0
Provide permanent wireman to Kotaluk village

कोतळूक ग्रामपंचायत

259
SHARES
741
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोतळूकवासियांची मागणी, 20 जानेवारी पर्यंतची मुदत

गुहागर, ता.14 : कोतळूक गावाला पूर्णवेळ कायमस्वरुपी वायरमन द्या. अशी मागणी कोतळूकचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सचिन ओक यांनी महावितरण उपविभाग, गुहागर कार्यालयाकडे केली आहे. 20 जानेवारी पूर्वी वायरमन नेमणूक न झाल्यास नाईलाजाने लोकशाही मार्गाने 25 जानेवारी 2023 रोजी ग्रामस्थांसमवेत आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. असा इशाराही सचिन ओक यांनी दिला आहे. Provide permanent wireman to Kotaluk village

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

श्री. सचिन मुकुंद ओक हे गुहागर तालुका भाजपा सरचिटणीस, कोतळूक ग्रामपंचायत सदस्य व कोतळूकचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी महावितरण उपविभाग, गुहागरला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोतळूक गावामध्ये गेले अनेक वर्ष कायमस्वरुपी वायरमन नसल्याने सर्व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या असणारे वायरमन यांचा गावाजवळ संपर्क राहिलेला नाही. चार महसूल गाव असलेल्या कोतळूक गावाची लोकसंख्या  2625 असून 15 वाड्या आहेत. गावामध्ये कायम स्वरुपाचा वायरमन नसल्याने गंजलेले पोल, खाली आलेल्या विद्युत वाहिन्या, विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढत आहेत. विद्युत बिले मात्र ग्रामस्थ वेळोवेळी भरत आहेत. Provide permanent wireman to Kotaluk village

यापूर्वीही कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने वायरमन नेमणूकीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतू त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.  तरी या गोष्टींचा गांर्भीर्यपूर्वक विचार करून कोतळूक गावासाठी कायमस्वरुपी पूर्णवेळ वायरमन यांची तातडीने नियुक्ती करावी व तशी लेखी माहिती मला मिळावी. तसेच 20 जानेवारी पूर्वी वायरमन नेमणूक न झाल्यास नाईलाजाने लोकशाही मार्गाने 25 जानेवारी 2023 रोजी ग्रामस्थांसमवेत आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. Provide permanent wireman to Kotaluk village

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarProvide permanent wireman to Kotaluk villageUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.